Jailer Box office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Jailer Box office Collection : बॉक्स ऑफिसवर फक्त जेलरच...गदर, रॉकी और रानी सगळ्याच चित्रपटांना टाकलं मागे

Rahul sadolikar

Jailer,Gadar 2 Box Office Collection : या महिन्यात बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गदर 2 बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे रजनीकांतचा जेलरही जगभरात भरपूर कमाई करत आहे.

कमाईच्या बाबतीत रजनीकांतच्या चित्रपटासमोर रॉकी और रानी की प्रेमकहानी फिका पडत आहे. दरम्यान, घूमरने कशी कमाई केली याचाही संपूर्ण अहवाल वाचा.

ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिस

 ऑगस्ट महिना बॉक्स ऑफिसवर खूपच आव्हानं होती. या महिन्यात, 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' रिलीज होण्याआधीच, रजनीकांतचा जेलर आला त्याच्या तुफान कमाईला सुरूवात झाली. 

भारतात जिथे सनी देओलच्या 'गदर 2' ने सर्व चित्रपटांची धुमाकूळ घातला, तर जगभरात सनी देओलच्या 'गदर 2 च्या पुढे ' रजनीकांतचा 'जेलर' कधीच निघून गेला आहे.

रजनीकांतच्या जेलरचा कल्ला

रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी हळूहळू कासवाच्या वेगाने कमाई करत असताना, सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर घूमरने फारशी कमाई केली नाही.

रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट चित्रपटगृहात येण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत होती. 10 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनेक भाषेत प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन 13 दिवस उलटले आहेत. बुधवारी 'जेलर'ने तमिळ भाषेत सुमारे 2.9 कोटींचा व्यवसाय केला.

तेलगू भाषेत या चित्रपटाने ८८ लाख, कन्नडमध्ये १ लाख, हिंदीत ३ लाखांचा व्यवसाय केला. जेलरची भारतातील एकूण कमाई 295.78 कोटी आहे, परंतु जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 523.4 कोटींचा व्यवसाय केला आहे.

रॉकी और राणी की प्रेमकहानी

'रॉकी और राणी की' प्रेमकहाणी कासवाच्या वेगाने पुढे जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २७ दिवस झाले आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे. या चित्रपटाने 27 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 65 लाखांची कमाई केली आहे.

करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा आकडा पार करू शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 147 कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत 315 कोटींची कमाई केली आहे

घूमरचं कलेक्शन

घूमर 18 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज झाला होता. स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात संयामी खेर आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला समीक्षक आणि इंडस्ट्रीकडून खूप चांगले प्रतिसाद मिळाले आहेत, परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई खूपच कमी आहे. सहा दिवसांत केवळ 4.51 कोटींचा व्यवसाय झाला आहे. या चित्रपटाने बुधवारी एकूण 35 लाखांची कमाई केली आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT