Jacqueline fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez: आलियानंतर आता जॅकलीनदेखील हॉलीवूडमध्ये दिसणार...

Jacqueline Fernandez: हॉलिवुड अॅक्टर जीन-क्लाउड वॅन डॅम सोबत तिने एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

दैनिक गोमन्तक

Jacqueline Fernandez: चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस पून्हा एकदा चर्चेत आली आहे.

जॅकलिनने टाकलेल्या एका पोस्टमुळे मनोरंजन विश्वात खळबळ निर्माण झाली आहे. हॉलिवुड अॅक्टर जीन-क्लाउड वॅन डॅम सोबत तिने एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे जॅकलिन आता हॉलीवू़डमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. आता बॉलीवूडमधील सगळ्या अभिनेत्री एका पाठोपाठ एक हॉलीवूडमध्ये जात असल्याचे सोशल मिडियावर म्हटले जात आहे.

जॅकलीनच्या या पोस्टमुळे तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. अनेकांनी तिच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

वरुण धवनने दिल्या शुभेच्छा

जॅकलिनने पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेता वरुण धवननेदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे जॅकलिन हॉलीवूडमध्ये काम करणार असल्याचे निश्चित झाल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जॅकलीनने कॅप्शनमध्ये वॅन डॅम सोबत कोलॅबरेशन करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. जॅकलीनच्या बॉलीवूडच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर ती लवकरच सोनू सूद आणि विजय राज यांच्यासोबत 'फतेह' या चित्रपटात दिसून येणार आहे. याआधी ती रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसून आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT