Adipurush  Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush Row: मुंबईच्या मल्टीफ्लेक्समध्ये हिंदू संघटनेने घोषणाबाजी करत 'आदिपुरुष'ला दर्शवला विरोध; पाहा व्हिडिओ

Adipurush Row: देवतांचा अपमान केल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Adipurush Row: आदिपुरुष रिलिज झाल्यापासून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे. आता मुंबईतील पालघर, नालासोपारा मल्टीफ्लेक्समध्ये हिंदू संघटनांनी घोषणाबाजी करत चित्रपटाचे स्क्रिंनींग बंद केल्याची घटना समोर आली आहे. एएनआयने याचा ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे.

याबरोबरच मल्टीफ्लेक्सचे मालक आणि घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते यांच्यात वाददेखील झाल्याची माहीती समोर आली आहे. याआधी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षांनी या चित्रपटाने हिंदू देवीदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करत दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. चित्रपटातील भाषा देवतांच्या चरित्राचा अपमान केल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता.

दरम्यान, आदिपुरपषचे निर्माते आणि लेखक यांनी ज्या संवादामुळे लोकांच्या भावना दुखावल्या ते संवाद बदलण्याचे आश्वासन प्रेक्षकांना दिले आहे. दरम्यान, चित्रपटात मी 4000हून जास्त संवाद लिहले आहेत. त्यातल्या 5 डायलॉगनी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या शेकडो ओळी ज्यामध्ये श्रीरामांचे कौतुक गेले आहे, सीतेचे सतीत्व दाखवले आहे , त्याला प्रशंसा मिळाली नाही.

माझ्या बांधवांनी सोशल मिडियावर माझ्यासाठी वाईट शब्द लिहले. त्यांनी माझ्या आईसाठी अभद्र शब्दांचा वापर केला. परंतु माझी तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. कारण कालही तुम्ही माझे होता, आजही तुम्ही माझे आहात आणि उद्याही माझे असणार आहात.

तुमच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे चित्रपटाचे निर्माता निर्देशकांनी संवादात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुपरस्टार प्रभास, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT