अभिनेत्याकडून चुकून गोळी झाडली  Dainik gomantak
मनोरंजन

हॉलीवूड अभिनेता अॅलेक बाल्डविनने बंदुकीतून महिलेवर झाडल्या गोळ्या...

हलिना हचिन्सच्या (Halina Hutchins) मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी (artists) तिला आदरांजली (Tribute) वाहिली.

दैनिक गोमन्तक

न्यू मेक्सिको: एका चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरण सुरु असताना अभिनेत्याकडून चुकून गोळी झाडली गेली. यामध्ये एका सिनेमॅटोग्राफर (Cinematographer) ठार झाला तर दिग्दर्शक (Director) जखमी झाले. जी बंदूक चित्रपटात वापरण्यात येणार होती त्यातूनच गोळी झाडली गेली. हि घटना न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथील बोनान्जा क्रीक रेंच या चित्रपट चित्रीकरणाच्या सेटवर घडली आहे.

असा झाला प्रकार:

या चित्रपटातील अभिनेता (Actor) एलेक बाल्डविन हे चित्रीकरण असताना त्यांच्याकडून चुकून गोळी झाडली गेली. या घटनेमध्ये 42 वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स हिचा जागीच मृत्यू झाला असून या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक वय वर्षे 48 जोएल सुझा या देखील गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या मध्ये जखमी झालेल्या हलिना हचिन्सला तात्काळ उपचारसाठी न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या रुग्णालयात(hospital) हेलिकॉप्टरने दाखल केले. मात्र, रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तसेच सुझा यांनाही जवळील रुग्णालयात दाखल केले. आता त्यांच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती उपलब्ध झाली नाही.

या घटनेनंतर बाल्डविन, सुझा आणि 'रस्ट'च्या कार्यकारी निर्मात्यांनी मात्र मौन बाळगले. तसेच याबाबत पोलिसांनी (Police) अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. तसेच यामध्ये हलिना हचिन्सच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी तिला आदरांजली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT