Prakash Raj Dainik Gomantak
मनोरंजन

प्रकाश राज यांच्याविरोधात हिंदू संघटनांकडून तक्रार दाखल... चांद्रयानाची खिल्ली उडवल्याचं प्रकरण पेटणार..

Rahul sadolikar

सध्या देशभरात चांद्रयान 3 मोहीमेची चर्चा सुरू आहे. एकीकडे रशियाची चांद्रयान मोहिम फसली असताना भारताने सोडलेल्या चांद्रयानाच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाबद्दल देशभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

'चांद्रयान-3' संदर्भात देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे तर दुसरीकडे अभिनेता प्रकाश राज यांना यासाठी ट्रोल केले जात आहे. 

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर चांद्रयान 3 ची खिल्ली उडवली होती, त्यानंतर आता त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

'चांद्रयान-3' मोहिमेवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निशाण्यावर आलेले दक्षिणेकडील सिनेसृष्टीतील अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात आता पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारताच्या चंद्र मोहिमेविरोधात अभिनेत्याच्या मजेशीर पोस्टने सर्वांनाच धक्का दिला त्यानंतर आता हिंदू संघटनांनी अभिनेत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.

हिंदू संघटना प्रकाशराज यांच्याविरोधात मैदानात

चंद्रयान 3 संदर्भात प्रकाश राज यांच्या या पोस्टपासून लोक त्यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल करत आहेत. आता देशातील हिंदू संघटनांच्या नेत्यांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली असून प्रकाश राज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रकाश राज यांची पोस्ट

प्रकाश राज यांनी नुकतीच ट्विटरवर एक वादग्रस्त पोस्ट टाकून इस्रोच्या चंद्र मोहिमेतील 'चांद्रयान 3'ची खिल्ली उडवली होती. प्रकाशराज यांनी चंद्र मोहिमेची खिल्ली उडवणारे कार्टून शेअर केले होते. 

त्यांच्या पोस्टमध्ये लुंगी घातलेला माणूस एका मगवरून दुसऱ्या मगवर चहा ओतताना दिसत आहे. या छायाचित्रासोबत त्यांनी लिहिले आहे, 'चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरमधून चंद्राचे पहिले छायाचित्र'

यूजर्सच्या प्रतिक्रिया

कार्टूनमध्ये दिसणार्‍या या व्यक्तीबद्दल प्रकाश राज यांनी काहीही लिहिले नसले तरी हे चित्र पाहून लोक नक्कीच संतापलेले दिसत आहेत. सोशल मीडियावरही ते सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. 

एका यूजरने लिहिले की, 'चांद्रयान हा भारत देशाचा प्रकल्प आहे. आमची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, अशी आमच्यासारख्या कोट्यवधी भारतीयांची मनापासून इच्छा आहे. आणि एक तुम्ही आहात! तुम्ही पक्ष आणि राष्ट्र यातील फरक विसरलात का? भाऊ सुधारा.

युजरची कमेंट

एकजण म्हणाला, 'प्रकाश जी, इस्रोच्या यशापासून राजकीय द्वेष दूर ठेवा. चांद्रयान मोहीम इस्रोची आहे, भाजपची नाही. त्यात यश आले तर ते कोणत्याही पक्षाचे नव्हे तर भारताचे यश असेल. तुम्ही आमच्या नजरेत खूप खाली गेला आहात असे लोक म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT