Hanuman Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

बजरंगबली येतायत भक्तांच्या भेटीला 'हनुमान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

तेज सज्जा अभिनीत हनुमान चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असुन सर्वत्र या ट्रेलरचं कौतुक होताना दिसत आहे.

Rahul sadolikar

तेज सज्जा स्टारर हनुमान या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटात भगवान हनुमानाची शक्ती असलेल्या एका नवीन भारतीय सुपरहिरोची प्रेक्षकांना ओळख करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले असून, एक नवे सिनेविश्व निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. हा चित्रपट एका भारतीय सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, ज्यामध्ये अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे.

याशिवाय विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी आणि वेनेला किशोर असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Goa Politics: "हे भाजपच्या राजकीय अध:पतनाचे लक्षण" विजय सरदेसाईंचा इशारा; 'नारळ' फोडून जल्लोष करणं पडणार महागात?

World Record: 6 चेंडू, 5 विकेट्स... मलिंगा, बुमराहला जमलं नाही, ते 'इंडोनेशियन गोलंदाजा'नं करुन दाखवलं! रचला इतिहास

ICC Ranking: स्मृती मानधनाची बादशाही संपली! दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड्टची अव्वल स्थानी झेप, जेमिमाची गरुडझेप

Goa University Elections Result: 15 वर्षांनंतर गोवा विद्यापीठात परिवर्तन, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आघाडीचा ऐतिहासिक विजय; 2027 च्या सत्तापालटाची नांदी?

Bangladesh Violence: 'पुरावा नसताना हिंदू तरुणाचा बळी घेतला', दीपू दासच्या हत्येवर शेख हसीनांचा संताप; बांगलादेशातील कट्टरपंथीयांवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT