Birju Maharaj Dainik Gomantak
मनोरंजन

मित्र गेला! पंडित बिरजू महाराजांचा वारसा चालवण्यासाठी नात रागिणीची धाव

एक फोटो शेअर करत रागिणीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "गुरुचे जाणे, आजोबांचे जाणे मान्य आहे, पण मित्राचे जाणे असह्य आहे, माझा खोडकर मित्र कुठे गेला आहे."

दैनिक गोमन्तक

पंडित बिरजू महाराज यांची नात रागिणी महाराज यांनी आज इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक (Dancer) महागुरू पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj) यांचे सोमवारी वयाच्या 83 व्या वर्षी त्यांच्या दिल्लीतील घरी येथे निधन झाले. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पंडित बिरजू महाराजांसोबतचा एक फोटो शेअर करत रागिणीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "गुरुचे जाणे, आजोबांचे जाणे मान्य आहे, पण मित्राचे जाणे असह्य आहे, माझा खोडकर मित्र कुठे गेला आहे."

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये रागिणीने चेहऱ्यावर ब्युटी मास्क घातला आहे आणि फोटोवरून अंदाज लावला जाऊ शकतो की नात आणि आजोबा स्तब्ध आहेत. आजोबांची आठवण करून रागिणी पुढे लिहिते की, "दुर्दैवाने, लोकांचे येणे-जाणे माझ्या हातात नाही, जर मी असते तर मीही तुझ्यासोबत गेले असते."

रागिणी पुढे लिहिते की, तोपर्यंत तुम्ही जिथे असाल तिथे एकट्याने गोंधळ घाला. ठुमरीचा अर्थ शिकवाल की, तुम्ही गेले 4 महिने बोलत होता पण शिकवू शकला नाही. तुम्ही मला जे शिक्षण दिले आहे ते मी आता लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि ते मी पार पाडणार आहे. अशी पोस्ट शेअर करण्याच्या एक दिवस आधी रागिणीने बिरजू महाराजांचा फोटो शेअर करताना एक भावपूर्ण कॅप्शन दिले होते.

रागिणीने लिहिले होते की, कृष्ण आणि शिव यांच्यात बृजश्याम माझा आहे, तिथे स्पर्धा होईल. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना रागिणीने सांगितले होते की, तिच्या आजोबांवर गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते. 12:15-12:30 च्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर 10 मिनिटांत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता

देशातील महान कलाकारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आणि पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, भारतीय नृत्य कलेला एक खास स्थान देणारे पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT