सुरेश नाईक Dainik Gomantak
मनोरंजन

लिटल मास्टरमधला गोमंतकीय 'सुरेश नाईक'

झी 5 या चॅनलवर सध्या चालू असलेला ‘डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर’ (Dance India Dance) या नृत्यस्पर्धेत गोव्याचा (Goa) सुरेश नाईक महत्त्वाची भूमिका निभावतो आहे.

दैनिक गोमन्तक

शरीराला निसर्गतः लयीची जाणीव असते. जेव्हा तालबद्ध संगीत ऐकले जाते तेव्हा शरीर आपसूकच त्या संगीताला (Music) प्रतिसाद देऊ लागते. पाय थिरकायला लागतात, शरीर वळसे घेते. प्रत्येकाच्या नाचाची सुरुवात लहानपणी अगदी अशीच होते. मात्र नृत्यावर जर प्रभुत्व मिळवायचे असेल तर शरीर त्याप्रमाणे पुढे प्रशिक्षित करावे लागते. नृत्याचा ध्यास धरावा लागतो. मिळेल तिथून थेंब थेंब मधु एकत्र केल्याप्रमाणे पदन्यास गोळा करावे लागतात. तरच भविष्यात ‘नृत्य’ हे कार्यक्षेत्र (करियर) बनवण्याच्या दृष्टीने आपण तयार होऊ शकतो.

झी 5 या चॅनलवर सध्या चालू असलेला ‘डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर’ (Dance India Dance) या नृत्यस्पर्धेत गोव्याचा (Goa) सुरेश नाईक महत्त्वाची भूमिका निभावतो आहे. या स्पर्धेत स्पर्धक मुलांना जी पथके मार्गदर्शन करते, त्यापैकी एका पथकामध्ये सुरेशचा महत्त्वाचा सहभाग आहे. या स्पर्धेशी जुळला गेल्यामुळे सुरेशसमोर एक वेगळे जग खुले झाले आहे. अर्थात भविष्यात आपल्याला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, याची कल्पना सुरेशला आहे पण त्याची पावले त्या दिशेने निश्चितच पडताहेत.

नृत्याची आवड असलेल्या सुरेशने आपले सुरुवातीचे धडे, नृत्याचे व्हिडीओ (Video) वगैरे पाहूनच गिरवले. अनेक ठिकाणी होणाऱ्या नृत्यस्पर्धांमधून भाग घेतला. पण त्याचबरोबर संधी मिळाली तेव्हा मुंबई (Mumbai) येथील नृत्य कार्यशाळेलाही हजेरी लावून तिथेही त्याने नृत्याचे प्रगत प्रशिक्षण घेतले. सुरेशची ‘वी स्टेप डान्स क्रू’ ही संस्था गोव्यातल्या तसेच गोव्याबाहेर होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या नृत्य स्पर्धामध्ये भाग घ्यायची. वेगवेगळ्या इव्हेंटमध्येही ते आपली अदाकारी दाखवायचे. ‘डान्स होअर्ड’ ही त्याची नृत्य अकादमी नृत्याचे प्रशिक्षणही देते.

सुरेश म्हणतो, ‘मात्र ‘लिट्ल मास्टर’ च्या माध्यमातून ज्याप्रकारचा अनुभव मला लाभतो आहे तो वेगळा आहे. गोव्यात मुलांबरोबर काम करणे ही वेगळी गोष्ट असते. गोव्यातली मुले नृत्यात नवखी असतात. मात्र ‘लिटल मास्टर’ मधल्या मुलांचा दर्जा हा फार वरच्या पातळीचा असतो. ती जरी नृत्याच्या विविध शैलीबद्दल अनभिज्ञ असली तरी ती नव्या स्टेप्स फार पटकन शिकतात व लगेच जुळवून घेऊ शकतात. म्हणून ते अशा स्पर्धांमध्ये उच्च स्थानी असतात.

एका नृत्य कार्यशाळेत सुरेशची ओळख पॉल मार्शलशी झाली, जे ‘लिटल मास्टर’ मधल्या स्पर्धकांची कोरियोग्राफी करणाऱ्या एका टिमचे प्रमुख होते. सुरेश त्यांना असिस्टंट म्हणून जॉईन झाला. अशातऱ्हेने सुरेश या रिएलिटी शो बरोबर जुळला गेला. सुरेश म्हणतो, ‘मी इथे आहे कारण मला शिकायचे आहे आणि आव्हानांचा सामना करायचा आहे. आज नृत्याचे क्षेत्र खूप स्पर्धात्मक बनले आहे. स्पर्धक बनून अशाप्रकारचा शो जिंकण्यासाठी काय करावे लागते हे मी इथे शिकतो आहे. त्यामुळे भावी काळात कदाचित एखाद्या शोमध्ये मी देखील चॅम्पियन बनू शकेन आणि त्यानंतर स्वतःहून एखादा प्रकल्प स्वतंत्रपणेही हाताळू शकेन.’

स्टेज शोसाठी कोरियोग्राफी करणे हे रिएलिटी शोपेक्षा खूप वेगळे असते. कॅमेऱ्यासाठी नृत्यदिग्दर्शन कसे करावे, कोणते ॲंगल आवश्यक आहेत इत्यादी गोष्टी सुरेश ‘लिटल मास्टर’ मध्ये राहून सध्या शिकत आहे. ‘मुले सहजपणे नृत्ये कशी शिकतात ते पाहून आश्चर्य वाटते. मुलांना एका नृत्यासाठी जवळपास चार दिवस प्रशिक्षण दिले जाते पण सराव मात्र त्यांना दररोज 12 ते 16 तास करावा लागतो.’ एका उत्तम व्यासपीठाचा अनुभव मिळालेला सुरेश नवोदित नर्तकांना सल्ला देताना म्हणतो, ‘तुम्हाला काय करायचे आहे हे ओळखणे आणि त्यानुसार प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. नृत्य कलाकार किंवा नृत्य दिग्दर्शक बनायचे असेल, तर प्रशिक्षणाला पर्याय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT