गोमंतकीय गायिका सिल्विया Dainik Gomantak
मनोरंजन

गोमंतकीय गायिका सिल्वियाने जगभरातील गायकांमधून वेधले लक्ष

गोमंतकीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली गोमंतकीय गायिका सिल्विया हिचा या गाण्यात महत्त्वाचा वाटा आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘वी आर वन ह्यूमन...’ असा तालबध्द उद्‍घोष करणाऱ्या गीताचा व्हिडिओ ‘वन ह्यूमन’ या नावाने हल्लीच युट्यूबवर प्रकाशित झाला. जगभरातल्या सुमारे 110 देशांमधल्या गायकांनी आणि वादकांनी या गीतात आपला सहभाग दिला आहे. गोमंतकीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली गोमंतकीय गायिका सिल्विया हिचा या गाण्यात महत्त्वाचा वाटा आहे. जगभरातील सुमारे 100 गायकांचा अंतर्भाव असलेल्या या गाण्याच्या काही ओळींना आपला आवाज देताना सिल्वियाचे ऐटबाज दर्शन या व्हिडिओत होते. (Goa singer Sylvia has an important role in song We Are One Human)

प्रसिध्द गीतकार, संगीतकार आणि अरेंजर ग्रॅहम झॅक यांनी मोठ्या कौशल्याने शेकडो वाद्ये आणि गायकांचा मिलाफ घडवून कष्टपूर्वक या व्हिडिओची निर्मिती केल्याचे जाणवते. जगभर अस्तित्वात असलेली अपरिचित तालवाद्ये आणि मोहक सुरावटी निर्माण करणारी इतर वाद्ये यांच्या साथीतून निर्माण झालेले हे पद अपूर्व असेच आहे.

गोव्याच्या बॅण्ड सर्कलमध्ये सिल्वियाचे नाव तसे खूपच परिचित आहे. देशातल्या साऱ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये ती गायली आहे. शॅगी, आॅट्टावान, काओमा, एरीक मार्टिन या सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कॉन्सर्टमधून ती चमकली आहे. ‘वन ह्यूमन’मधला तिचा सहभाग ही तिच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

‘मी सुदैवी...’

सिल्विया म्हणते की, तिच्यासाठी हा एक मैलाचा दगड आहे. गोव्यातील लहानशा गावातून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय मंचावर गायची संधी मिळणे तिच्यासाठी फारच आनंदाची बाब आहे. सिल्विया स्वतःला फारच सुदैवी मानते. ‘One Human’ असेे टाईप केल्यास हा व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. ऐकून आनंदी व्हावे असेच ते गाणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT