Rakhi Sawant Arrested Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant: 'भयानक दिसणारी व्यक्ती बुरखा घालून मुस्लिम होऊ शकत नाही' लोकप्रिय अभिनेत्रीचा राखीवर निशाना

Rakhi Sawant: सध्या राखी स्वत:ला मुस्लिम म्हणून घेत असून आपले नाव आता फातीमा असल्याचे देखील तिने जगजाहीर केले आहे.

दैनिक गोमन्तक

Rakhi Sawant: राखी सावंत विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता राखी तिच्या पतीमुळे पून्हा एकदा चर्चेचा भाग बनली आहे.

राखीने आदिल खान बरोबर लग्न केले होते. मात्र थोड्यात दिवसांत राखीने आदिलवर मारहाणीचे आरोप करत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटकदेखील करण्यात आली होती. आता आदिलची सुटका झाली असून दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत.

महत्वाचे म्हणजे राखी गेल्या काही दिवसांपासून आपण इस्लाम धर्म स्विकारल्याचे सांगत आहे. इस्लाम धर्मीयांप्रमाणेच पेहराव करत असून स्वत:ला फातीमा म्हणा असे आवाहन इतरांना करत आहे.

तिच्या या वागण्यावर सोशल मिडियावर टीका करण्यात येत आहे. बीग बॉस फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री गौहर खाननेदेखील राखीला कडक शब्दात सुनावले आहे. गौहरने एका चॅरिटीने २० अनाथ मुलांना उमराहसाठी पाठवल्याचे आपल्या इंस्टाग्रामवर म्हटले आहे.

पुढे तिने राखीचे नाव न घेता म्हटले आहे की, काही लोक इस्लामची थट्टा करत आहेत. भयानक दिसणारा माणूस बुरखा घातल्याने मुस्लिम होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

दरम्यान, याआधी राखी( Rakhi Sawant )ने आदिलवर आरोप करताना त्याने जबरदस्तीने आपला धर्म बदलला आणि इस्लाम धर्माचा स्विकार करायला लावला असे म्हटले होते. याबरोबरच, पाच महिन्यांच्या वैवाहिक जीवनात आदिलने आपल्याला बऱ्याचदा मारहाण केली आहे. त्याने माझ्याबरोबर पैशासाठी लग्न केले आहे असा आरोप तिने केला आहे.

राखीच्या या आरोपांवर आदिल खानने राखीला सना खानसारखे बनायचे होते असे एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राखीचे सगळी गुपिते जगासमोर आणेन असे त्याने म्हटले आहे.

आता आदिल आणि राखीमधील हा वाद कधी संपणार असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहेत. याबरोबरच, राखी आपल्या वक्तव्यामुळे, कधी आपल्या कृतींमुळे चर्चांचा भाग बनत असते. सध्या राखी स्वत:ला मुस्लिम म्हणून घेत असून आपले नाव आता फातीमा असल्याचे देखील तिने जगजाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar 2026: शनीचे 'महागोचर'! 5 राशींच्या लोकांना बनवणार करोडपती आणि भाग्यवान; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

Maharashtra ATF VAT Reduction: विमान प्रवाशांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय; विमान इंधनावरील 'व्हॅट' थेट 18 टक्क्यांवरुन 7 टक्क्यावर

PM Modi UAE Visit 2026: "होर्मुजची कोंडी फुटणे ही आमची प्राथमिकता'' पीएम मोदींचा युएईच्या भूमीवरुन जगाला शांततेचा संदेश

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT