Gauahar Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Gauahar Khan: गौहर खाननं खास व्हिडिओ शेअर करत दिली गुड न्यूज

गौहर खान बॉलिवूडमध्ये आयटम साँगसाठी फेमस आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमध्ये आलिया, बिपाशानंतर आता गौहरने गोड बातमी देत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. गौहरने सोशल मिडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत आई होणार असल्याची गोड बातमी दिली आहे.

गौहरनं इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एकदम हटके पद्धतीने तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग करणाऱ्या गौहरने 25 डिसेंबर 2020 रोजी जैद दरबारशी लग्नगाठ बांधली. जैद दरबार हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून गौहर आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरू होत्या. पण तिने यावर बोलणे टाळले होते. अखेर तिने चाहत्यांसोबत ही खास बातमी शेअर केली आहे.

गौहर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. एकदा आस्क मी एनिथिंग या सेशमध्ये तिला गरोदरपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मुलाचे प्लॅनिंग कधी? असा प्रश्न गौहरला सतत विचारण्यात येत होता. यावर तिने म्हटले होते की ‘जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा’. तसेच अनेक रिअॅलिटी शोमध्ये स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या गौहर खान 'तांडव' सीरिजमध्ये वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT