Gadar 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Sunny Deol Upcoming Movie Gadar 2: गदर 2 ची स्पेशल स्क्रिनिंग; जवान म्हणाले हिंदूस्तान...

Sunny Deol Upcoming Movie Gadar 2: तुम्हाला हा चित्रपट आवडेल की नाही हे 11 ऑगस्टला चित्रपटगृहात समजेल असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Sunny Deol Upcoming Movie Gadar 2: गदर 2 या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 11ऑगस्टला रिलिज होणाऱ्या या चित्रपटाचा रिव्ह्यू मात्र आधीच समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा रिव्ह्यू दुसऱ्या कोणी दिला नसून चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिला आहे.

22 वर्षापूर्वीच्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातलेल्या गदर या चित्रपटाचा हा सिक्वेल असून सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.

चित्रपटगृहात हा चित्रपट 11ऑगस्टला दाखल होणार असला तरीही 8 ऑगस्टला भारतीय( India ) सैन्यासाठी गदर 2ची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. हा चित्रपट कसा होता, चित्रपटावेळी सैनिकांचा अनुभव कसा होता हे खुद्द निर्मात्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत शेअर केली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, चित्रपट पाहिल्यानंतर सैनिकांचे डोळे भरुन आले होते. इतकेच नाही तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला. स्टारकास्टच्या कामाचे कौतुक तर केलेच त्याचबरोबर गदर पेक्षा गदरचा सिक्वेल जास्त चांगला असल्याचे सांगितले आहे.

अनिल शर्मा यांनी ट्वी़ट करत सैन्य अधिकाऱ्यांनी 8ऑगस्टला आपापल्या परिवारासोबत स्पेशल स्क्रिनींगदरम्यान गदर 2 चा पहिला प्रिव्हयू पाहिला. गदर 2 ची संपूर्ण टीम त्यांच्या प्रतिसाद आणि सैन्याधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आता तुम्हाला हा चित्रपट आवडेल की नाही हे 11 ऑगस्टला चित्रपटगृहात समजेल असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 'गदर2' मध्ये सनी देओलसोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 22 वर्षापूर्वी आलेल्या गदरने बॉक्स ऑफीसवर मोठा धुमाकुळ घातला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिले होते.

'गदर 2' चित्रपट( Movie ) 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तारा आणि सकीना पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी थिएटरमध्ये दाखल होत आहेत. चित्रपटाची दोन गाणी आणि ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT