Sunny Deol  Dainik Gomantak
मनोरंजन

Gadar 2 Song Release: 'उड जा काले कावा' म्हणत तारा सिंग अन् सकीनाची पुन्हा प्रेक्षकांना भूरळ

Gadar 2 Song Release: मात्र आता अमिषा पटेल यांची नवीन झलक पाहायला मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

Gadar 2 Song Release: गदर 2 या चित्रपटाची चाहते वाट बघत आहेत. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि लोकप्रिय अभिनेत्री अमिषा पटेल चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काही अवधी असला तरीही निर्मात्यांनी चाहत्यांसाठी गदर २ मधील एक गाणे रिलिज केले आहे. उड जा काले कावा हे सुप्रसिद्ध गाणे निर्मात्यांनी प्रदर्शित केले असून चाहते या गाण्याला भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

गदर मधील हे गाणे रिक्रिएट केले असून हे सुपरहिट गाणे प्रेक्षकांना २२ वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाईल. तारा सिंग आणि सकीनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पून्हा एकदा भूरळ घालताना दिसत आहे. गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मिडिया( Social Media) वर ट्रेडिंग होताना दिसत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरशिवाय अमिषा पटेल यांचा कोणताही लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाले नव्हते. मात्र आता अमिषा पटेल यांची नवीन झलक पाहायला मिळाली आहे.

'उड जा काले कावा' या गाण्यात गदर मधील काही सीन्स फ्लॅशबॅक होताना दिसतात. गाणे रिलिज झाल्यानंतर आत्तापासूनच चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हटले आहे.

एका युजरने लिहले आहे फक्त 90 च्या दशकातील लोक सनी देओलला या लूक मध्ये पाहण्याचा भावनेला समजू शकतात. काहींच्या म्हणण्यानुसार ते आता चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहू शकत नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, गदरच्या पहिल्या सीझन इतकाच गदर चा दुसरा सीझन गाजणार का? गदर 2 प्रेक्षाकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT