Hritik Roshan  Dainik Gomantak
मनोरंजन

Fighter: हृतिकच्या चित्रपटाला रिलिज होण्यापूर्वीच 'या' देशांनी दिला धक्का!

दैनिक गोमन्तक

Fighter: हृतिक रोशन आणि दीपिकाचा आगामी चित्रपट 'फायटर' रिलिज होण्याआधीच मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळाले होते. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

२५ जानेवारी २०२४ ला फायटर चित्रपटगृहांमध्ये रिलिज होणार आहे. भारतातील प्रेक्षकांना याचा आनंद घेता येणार आहे. मात्र भारताबाहेरील आखाती देशांमध्ये फायटर अजूनपर्यंत ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. युएई( UAE ) वगळता इतर आखाती देशांमध्ये फायटर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी परवानगी मिळाली नसल्याची माहिती चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माते गिरीश जोहर यांनी दिली आहे. मात्र, या बंदीचे कारण अजूनही समोर आलेले नाही.

गिरीश यांनी ट्विट केले की, 'फायटरच्या थिएटर रिलीजवर मध्य पूर्व प्रदेशांमध्ये अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. फक्त UAE हा चित्रपट प्रदर्शित करेल! अशा परिस्थितीत बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबियामध्ये तो रिलीज होणार नाही. फक्त UAE मध्ये राहणारे लोक ते पाहू शकतील. याबाबत निर्मात्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

दरम्यान, चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु असून कोट्यावधीची तिकिटे विकली गेली आहेत. आता हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार का आणि बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT