Fighter Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Fighter Box Office Collection: हृतिक अन् दीपिकाच्या फायटरची बॉक्स ऑफीसवर कमाल!

Fighter Box Office: रविवारी प्रजासत्ताक दिनी सर्वाधिक 39.5 कोटींची कमाई केली होती, तर सोमवारपासून चित्रपटाची तिकीट विक्री कमी झाली.

दैनिक गोमन्तक

Fighter Box Office: ऋतिक रोशन आणि दीपीका पादुकोणचा फायटर हा चित्रपट रिलिज होऊन ११ दिवस झालेत. सुरुवातीच्या काही दिवसात या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. मात्र त्यानंतर चित्र काहीसे बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. चला तर जाणून घेऊयात या चित्रपटाने रिलिज झाल्यापासून आत्तापर्यंत बॉक्स ऑफीसवर किती कमाई केली आहे.

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास २९१ कोटींची कमाई केली आहे. 10 दिवसांत 277.25 कोटी रुपये जमा झाले. त्याचबरोबर विदेशात 10 दिवसांत 82.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर भारतातील एकूण कलेक्शन 200 कोटींच्या अगदी जवळ आहे.

रविवारी प्रजासत्ताक दिनी सर्वाधिक 39.5 कोटींची कमाई केली होती, तर सोमवारपासून चित्रपटाची तिकीट विक्री कमी झाली. या वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढली आहे, समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 11 व्या दिवशी 13 कोटी रुपये कमावले असून एकूण कमाई 175.75 कोटी रुपये अशी आहे.

250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सिद्धार्थ आनंदचा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे 25 जानेवारी रोजी देशभरातील सुमारे 4200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशनशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT