Kajol's New Tweet Dainik Gomantak
मनोरंजन

Kajol's New Tweet : 'कठीण काळातून जात आहे' काजोलच्या या ट्विटने सोशल मिडीयावर चर्चांना उधाण

अभिनेत्री काजोलने नुकत्याच केलेल्या एका ट्विटने चर्चांना उधाण आले आहे.

Rahul sadolikar

सध्या अभिनेत्री काजोलची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडची दिग्गज आणि आघाडीची अभिनेत्री काजोल ही सतत चित्रपटांमध्ये सक्रिय असते. काजोल गेल्या काही दशकापासून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. अभिनेत्री काजोलने केलेल्या एका ट्विटमुळे सध्या ती चर्चेत आहे.

काजोल हा हसlमुख आणि आनंदी स्वभाव चाहत्यांना खुप आवडतो. तिच्या चाहत्यांची संख्याही बरिच आहे. मात्र आता काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामागच कारणही तसचं काहीस आहे.

अभिनेत्री काजोलनं सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. काही काळापूर्वी काजोल इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ती सोशल मीडियापासून लांब जात असल्याच तिनं या पोस्टमधुन म्हटलं आहे.

काजोलनं तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना काजोलने लिहिले की, ती तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेचा सामना करत आहे.

त्याचबरोबर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे लिहिले आहे. तिच्या सर्व पोस्ट इंस्टाग्राम फीडमधून गायब झाल्या आहेत. काजोलच्या या पोस्टमुळे तिच्या सर्व चाहत्यांना आता तिची चिंता होत आहे.

काजोलचे इंस्टाग्रामवर 14.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यासोबतच काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय देखील असते. तिच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. काजोलनं असं पाऊल का उचललं आणि आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याचा सामना करत आहे म्हणजे नेमक तिला काय म्हणायचं आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

तर दुसरीकडे काजोलने तिच्या आगामी चित्रपटासाठी हा एक प्रमोशनल स्टंट असल्याचंही अनेकांच मत आहे. काही काळापुर्वी काजोलने तिच्या 'दुष्मन' चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास पोस्टही शेअर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT