Kangana Ranauat Dainik Gomantak
मनोरंजन

Emergency: ठरलं तर! कंगनाचा नवा चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला; पोस्टरही रिलिज

Emergency: अभिनेत्री इमर्जन्सी चित्रपटातून पुन्हा एका प्रेक्षकांचे मनोरंजन कऱण्यास सज्ज झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Emergency: मनोरंजन सृष्टीत कंगना रणौत म्हणजे बॉलीवूडची क्वीन असे समीकरण तिच्या क्वीन चित्रपटामुळे तयार झाले आहे. याबरोबरच तिच्या अभिनय कौशल्याचे जगभर चाहतेदेखील पाहायला मिळतात. मात्र कंगना अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करते त्यामुळे तिला बऱ्याचदा टीकेचा धनी व्हायला लागते. आता एकापाठोपाठ फ्लॉफ चित्रपटानंतर अभिनेत्री इमर्जन्सी चित्रपटातून पुन्हा एका प्रेक्षकांचे मनोरंजन कऱण्यास सज्ज झाली आहे.

इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. विशेष म्हणजे कंगना राणौत स्वतः या चित्रपटाची दिग्दर्शक, निर्माती असून तिने चित्रपटात अभिनयदेखील केला आहे. या चित्रपटात कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

हा चित्रपट 'आणीबाणी'वर आधारित आहे, जी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटना आहे. ही घटना इंदिरा गांधींभोवती फिरते. 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कंगना रणौतने सोशल मीडियावर तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वृत्तपत्राच्या पानांवर 'आणीबाणी'च्या बातम्या दिसत असतानाच इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतही दिसत आहे. तसेच, भारतातील सर्वात अंधाऱ्या तासामागील गोष्ट १४ जूनला उलघडच आहोत, अशा आशयाचे तिने कॅप्शनदेखील लिहले आहे.

हा चित्रपट हा महत्वाकांक्षी चित्रपट असून दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील मणिकर्निकानंतरचा दुसरा महत्वाचा चित्रपट असल्याचे म्हणत कंगनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कंगनाचे कट्टी बट्टी' ते 'रंगून', 'सिमरन', 'थलाईवी', 'धाकड', 'पंगा' आणि 'तेजस' हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच फ्लॉफ झाले आहेत. आता इमर्जन्सी चित्रपट कंगनाच्या करिअरची गाडी रुळावर आणणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT