Ayushman Khurana Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Dream Girl 2 Teaser : 'ड्रिम गर्ल 2'च्या भन्नाट टिजरमध्ये रणबीर कपूर ठरला झूठा आणि मक्कार

ड्रिम गर्ल 2 चा जबरदस्त टिजर नुकताच रिलीज झाला आहे यात रणबीर कपूरची मजेदार एन्ट्री आहे.

Rahul sadolikar

Dream Girl 2 Teaser: अभिनेता आयुष्मान खुराना एक कसलेला अभिनेता आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या भूमीकांमधून त्याने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आर्टिकल 15, विकी डोनर, अंधाधुन या चित्रपटातून त्याने आपल्यातला एक संयत अभिनेता दाखवून दिला आहे.

ड्रिम गर्ल हा आयुष्यमान खुरानाचा चित्रपट प्रेक्षकांना खूप हसवून गेला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. नुकतच या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आहे. यात रणबीर कपूरची मजेदार संवाद ऐकायला मिळत आहे.

तू झूठी मै मक्कारचं प्रमोशन याच टिजरमधून केल्याचं सध्या दिसतंय. एका फोन कॉलवरचा हा संवाद आहे. ज्यात रणबीर कपूर आणि ड्रिम गर्ल आयुष्मान खुराना बोलत असतात.

या टिजरमध्ये ओठांना लिपस्टिक लावून आणि कानातले सुंदर इयर रिंग्ज घालून आयुष्मान खुराना रणबीरशी बोलत असतो. अतीशय रोमॅंटिक अशा या संवादात आयुष्मान रणबीर झूठा आणि मक्कार म्हणत असतो.

या 'टिजरमध्ये आयुष्मान एका महिलेच्या वेशात आणि स्त्रीच्या आवाजाची नक्कल करताना दिसत आहे. मात्र, पूजा म्हणून त्याचा पूर्ण चेहरा दाखवलेला नाही. यात तो अभिनेता रणबीर कपूरशी बोलताना ऐकू येतो .

"हॅलो मी पूजा बोलतेय. तुम्ही कोण?" 'ड्रीम गर्ल' आयुष्मान विचारतो.

त्याला प्रतिसाद देताना, कॉलच्या पलीकडे असलेल्या एका व्यक्तीने म्हटले, "तु माझा आवाज नाही ओळखलंस ?," त्यानंतर रणबीरच्या 'बचना ए हसीनो' गाण्याचे बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं.

"पछाडलंस, एक नंबरचा खोटारडा आहेस तू.. लग्नाचं वचन मला दिलंस आणि लग्न दुसऱ्याशीच," आयुष्मान पुढे म्हणाला.

त्याला प्रत्युत्तर देताना, कॉलरने टोमणा मारला, "सगळ्या अफवा आहेत," त्यानंतर बॅकग्राऊंडला एक महिला बोलते "कोण आहे आरके? कुणाशी बोलतोयस ?" यावर रणबीर उत्तर देतो, "कुणी नाही ती भटिंड्याची आत्या आहे."

आयुष्मान पुढे म्हणाला, "खोटारड्या ...कधी भेटणार आहेस ? यावर रणबीर म्हणतो 7 जुलै ला आपला रंग दाखवायला येतोय. याला उत्तर देताना आयुष्यमान म्हणतो..कपूर शिवाय पूजा कशी होणार?" 7 जुलैला प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक भन्नाट कॉमेडीचा तडका असणार हे नक्की. हा टिजर एकदा पाहाच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT