Priyanka Chopra And Ranveer Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Don 3: रणवीर-प्रियंकाची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र?

Don 3: प्रियांका चोप्राने यापूर्वी रणवीरसोबत 'गुंडे', 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो'मध्ये काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

Don 3: डॉन ३ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. फरहान अख्तरने या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सुरुवातीला शाहरुखच मुख्य भूमिकेत दिसणार असे प्रेक्षकांना वाटत होते. मात्र शाहरुख चित्रपटाचा भाग नसल्याचे समजातच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आता डॉन ३ चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहे. तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत प्रियंका चोप्रा दिसण्याची शक्यता असल्याची म्हटले जात आहे.

प्रियांकाने 'डॉन 3'ला होकार दिल्याचे बोलले जात आहे. फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. या चित्रपटासाठी यापूर्वी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉनला अप्रोच करण्यात आले होते. मात्र कोणाचेही नाव निश्चित झाले नाही. आता 'डॉन 3'चे शूटिंग कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र प्रियांका चोप्राचे नाव फायनल असल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, 'जी ले जरा'च्या कलाकारांची निवड अजून झाली नसल्यामुळे, फरहान अख्तर 'डॉन 3' कडे लक्ष देत आहे. तो लवकरच प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंगसोबत 'डॉन 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. प्रियांकाने नुकतीच फरहान अख्तरची भेट घेतली असून त्यांनी 'डॉन 3' बद्दल चर्चा केल्याचे म्हटले जात आहे.

रणवीर सिंग आणि प्रियांकाचे चित्रपट

प्रियांका चोप्राने यापूर्वी रणवीरसोबत 'गुंडे', 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो'मध्ये काम केले आहे. रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे असेल तर तो सध्या 'सिंघम अगेन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर प्रियांका चोप्रा तिच्या काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम पूर्ण करून 'डॉन 3' मध्ये सामील होऊ शकते. प्रियांका 'सिटाडेल 2' मध्येही दिसणार आहे.

आता पुन्हा एकदा रणवीर-प्रियंकाची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT