Johnny Depp Dainik Gomantak
मनोरंजन

...म्हणून डिस्नीने जॉनी डेपला दिली 2 हजार कोटींची ऑफर

जॉनीचे चाहते पुन्हा जॉनीला कॅप्टन जॅक स्पॅरोच्या भूमिकेत पाहू शकणार

दैनिक गोमन्तक

‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ द्वारे जगभरातील अनेक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता जॉनी डेपने याने बराच काळ सुरु असलेला डिस्नीने विरोधातील खटला नुकताच जिंकला आहे. यानंतर तो एका वेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे. अँबरचे प्रकरणात जॉनी डेपकडून अनेक चित्रपट हिसकावण्यात आले होते. यावर डिस्नेने जॉनी डेपला माफीनामा पत्र पाठवले आहे, आणि त्याला ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ चित्रपटाच्या नव्या भागासाठी ऑफर दिली आहे. ( Disney offers Rs 2,000 crore to Pirates of the Caribbean actor Johnny Depp )

या सुपरहिट फ्रँचायझीचे एकूण पाच भाग आले आहेत, ज्यामध्ये जॉनीने कॅप्टन जॅक स्पॅरोची भूमिकेने आपली वेगळी ओळख केली आणि या भूमिकेतून जॉनीने प्रेक्षकांची मने ही जिंकली. डिस्नेने आता या फ्रँचायझीच्या सहाव्या भागासाठी 2 हजार 535 कोटी रुपये म्हणजेच 301दशलक्ष डॉलर देणार असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाशी संबंधीत कंपनीने जॉनीला 301 दशलक्ष डॉलर देण्याची तयारी करत असून त्यासोबत एक माफीनामा देखील पाठवला आहे. त्यामूळे जॉनीचे चाहते त्याला पुन्हा एकदा कॅप्टन जॅक स्पॅरोच्या भूमिकेत पाहू शकतील अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. दरम्यान, याआधी अँबरचे प्रकरण पाहता जॉनी डेपकडून अनेक चित्रपट हिसकावण्यात आले होते. या चित्रपटांमध्ये ‘फँटास्टिक बीस्ट ३’ आणि ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ सारख्या चित्रपटांची नावे आहेत, ज्यांच्या निर्मात्यांनी जॉनीला चित्रपटासाठी साइन करण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT