Govinda  Dainik Gomantak
मनोरंजन

"शाहरुख - सलमान'च्या नावाने रडून आता घरात बसलाय" दिग्दर्शक निहलानी गोविंदाबद्दल असं का म्हणाले?

Rahul sadolikar

Director Pahlaj Nihalani talking about how Govinda : साजन चले ससुराल, हिरो नं 1, स्वर्ग, क्योंकी मै झूठ नही बोलता यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता गोविंदाचं स्टारडम आता पूर्वीसारखं नाही राहिलं. आता ते संपल्यातच जमा आहे.

एकेकाळी बॉलीवूडचा सुपरस्टार असणाऱ्या गोविंदाला नंतर चित्रपट मिळणं मुश्किल झालं होतं. लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर गोविंदा राजकारणातही रमला नाही.

एकीकडे गोविंदाचे करिअर संपत असताना दुसरीकडे गोविंदा राजकारणातूनही कायमचा बाहेर पडला.

पहलाज निहलानी म्हणतात

गोविंदाचं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असताना सलमान खानच्या पार्टनर या चित्रपटातून त्याने पुनर्रामन केलं पण तरीही त्याचे पुढचे चित्रपट फ्लॉप ठरले. चित्रपट निर्माता आणि CBFC चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी आणि गोविंदा यांनी एकेकाळी एकत्र चित्रपट केले होते. मात्र आता त्यांचे नाते बिघडले आहे. 

अलीकडे पहलाज निहलानी या अभिनेत्यासोबतच्या त्याच्या बिघडलेल्या नात्याबद्दल बोलले. निहलानी यांनी गोविंदावर इंडस्ट्रीविरुद्ध खोटे 'षडयंत्र' रचल्याचा तसेच तो आणि सलमान-शाहरुख खानवर रडत राहिल्याचा आरोप केला . यासाठी निहलानींनी दिग्दर्शक डेव्हिड धवनलाही जबाबदार धरले आहे.

शाहरुख सलमानच्या नावाने रडायचा

अलीकडेच, पहलाज निहलानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबतच्या मतभेदांमुळे मी गोविंदासोबत काम करणेही बंद केले आहे. डेव्हिड धवनने 90 च्या दशकात गोविंदासोबत अनेक हिट चित्रपट दिले. 

पहलाज निहलानी म्हणाले की, रंगीला राजा रिलीज होण्यापूर्वी गोविंदा बॉलीवूडविरोधात रचल्याबद्दल रडायला लागला होता. तो सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या स्टार्सची नावे घेऊ लागला.

गोविंदामुळे चित्रपट फ्लॉप झाला

अमर उजालाच्या वृत्तानुसार पहलाज निहलानी म्हणतात की, गोविंदाने पसरवलेल्या गैरसमजांंमुळेच चित्रपट फ्लॉप झाला. 'रंगीला राजा'ची निर्मिती पहलाज निहलानी यांनी केली होती.पहलाज निहलानी यांनी दावा केला आहे की गोविंदामुळे झालेल्या वादानंतर वितरकांनी त्याच्या चित्रपटाचे शो रद्द केले. 

आँखेनंतर गोविंदासोबत काम केले नाही

'आँखे'नंतर गोविंदासोबत अनेक वर्षे काम का केले नाही, असा प्रश्न पहलाजला विचारण्यात आला. याचे कारण स्पष्ट करताना तो म्हणाला, 'डेव्हिड धवनने गैरसमज निर्माण केले. 

माझ्या चित्रपटांच्या यशामागे तो एकटाच कारणीभूत आहे असे त्याला वाटत होते. पण जेव्हा मी अनिल कपूरसोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना विश्वासघात झाल्यासारखे वाटले. 

यानंतर तो माझ्या आणि गोविंदाबद्दल गॉसिप करू लागला. माझ्याविरुद्ध द्वेष पसरवले . सगळे कलाकार आले आणि मला सांगायचे डेविड माझ्याबद्दल काय म्हणाला ते. यानंतर आमचे मार्ग वेगळे झाले".

गोविंदाने माझा चित्रपट सोडला

पहलाज निहलानी म्हणाले, 'गोविंदाने स्वतः माझा एक चित्रपट सोडला. त्याची शूटिंग आम्ही आधीच सुरू केली होती. नंतर मी इतर कलाकारांसोबत ते पूर्ण केले. 

त्यानंतर जेव्हा त्यांना 'अवतार' नावाच्या चित्रपटासाठी एकत्र काम करायचे होते, तेव्हा गोविंदाला त्याचे शीर्षक आवडले नाही आणि त्यांनी ते सोडले. 

शेवटी 'रंगीला राजा'मध्ये एकत्र काम केले. निहलानी म्हणाले, 'रंगीला राजा' हा चित्रपट रजनीकांतच्या चित्रपटाचा रिमेक होता आणि गोविंदाने रजनीकांतपेक्षा चांगले काम केले आहे.

आता गोविंदा घरात बसला आहे

निहलानी पुढे म्हणाले "मला खात्री होती की तो काही पुरस्कार जिंकेल. पण, त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये बाजूला झाल्याबद्दल मीडियासमोर रडायला लागला. यासाठी सलमान आणि शाहरुख खानला जबाबदार धरण्यात आले. याचा परिणाम चित्रपटावर झाला. आणि आता बघा, तो घरी बसला आहे". मात्र, आता गोविंदाचे सलमान खानसोबतचे संबंध सुधारल्याचे बोलले जात आहे. नुकतेच दोघेही स्टेजवर एकत्र दिसले.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT