Kiara-Sidharth Dainik Gomantak
मनोरंजन

Kiara-Sidharth: लवकरच होणार सिद्धार्थ, कियाराचे लग्न? कियाराच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

कियाराच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

Pramod Yadav

बॉलीवूड चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कियारा अडवाणी (Kiara Advani) नेहमीच चर्चेत असते. कियारा आणि सिद्धार्थ (Sidharth Malhotra) यांच्या जवळीकतेच्या अनेक बातम्या मागील काही काळापासून समोर येत आहेत. दोघेही लवकरच लग्न देखील करणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, कियारा अडवाणीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. कियाराच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

कियारा अडवाणीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कियाराचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. काही सेकंदांचा असलेल्या या व्हिडिओत कियारा अतिशय आकर्षक दिसत आहे. पाहण्यासारखी आहे.

'जास्त काळ गुप्त ठेवू शकत नाही! लवकरच येत आहे... स्टे ट्युनड... 2 डिसेंबर.' असे कॅप्शन या व्हिडीओला कियाराने दिले आहे.

कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे चाहते दोघांच्या लग्नाची घोषणा करणार असल्याचा अंदाज लावत आहेत. तर अनेकांनी दोघांच्या लग्नाचा मुद्दा असेल तर तो जुना झाला आहे. असे म्हटलं आहे. एका यूजरने, 'लग्न होणार आहे. ही घोषणा आहे. तू सिद्धार्थशी लग्न करणार आहेस. आम्हाला माहीत आहे.' अशी कमेंट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT