Dhanush Dainik Gomantak
मनोरंजन

Dhanush: धनुषचा नवा अवतार पाहून चाहते घाबरले; म्हणाले हा तर..

Dhanush: आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. धनुषचा हा 50 वा चित्रपट आहे.

दैनिक गोमन्तक

Dhanush: धनुष हा आपल्या अभिनयासाठी लोकप्रिय आहे. आता तो रायन या चित्रपटात दिसणार असल्याची त्याने घोषणा केला होती. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. धनुषचा हा 50 वा चित्रपट आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुष एप्रन घातलेला आणि रक्ताने माखलेला दिसत आहे. त्याने एका हातात स्क्रू ड्रायव्हर धरला आहे. रायनच्या पोस्टरमध्ये धनुष मिशी असलेला दिसत असून त्याने मुंडण केले आहे. डोळ्यात राग आणि वेदना स्पष्ट दिसत आहेत. फर्स्ट लूक पोस्टरवरून असे दिसते की धनुष एका फूड ट्रकसमोर उभा आहे. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला तो कॅमेऱ्यात बघतोय.

धनुषच्या या अवताराने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. धनुष 'रायान'मध्ये केवळ अभिनयच करणार नाही, तर त्याचे दिग्दर्शन आणि कथालेखक देखील आहे. 'रायान'मध्ये धनुषला पाहून चाहते वेडे झाले आहेत. अभिनेत्याचा लूकवर अनेक प्रतिक्रिया चाहते करत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने लिहिले आहे - हा लूक पॉवरफुल आहे. आणखी एका चाहत्याने लिहले आहे - नक्कीच ही एक मास फिल्म असेल. त्याची आतुरतेने वाट पाहतोय. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे -धनुष आता आग लावेल. तो एक आणखी एका चाहत्याने लिहिले आहे - हा चित्रपट तामिळ सिनेमासाठी बेंचमार्क ठरेल.

'रायन' तामिळ, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सर्व भाषांमध्ये अभिनेत्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रहमानने दिले आहे. धनुषशिवाय, नित्या मेनन, वरलक्ष्मी सरतकुमार, संदीप किशन सारखे इतर अनेक स्टार्स 'रायन' मध्ये दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT