Jacqueline fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Extortion Case: 215 कोटींच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला समन्स

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावले आहे.

दैनिक गोमन्तक

Jacqueline Fernandez Extortion Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावले आहे. न्यायालयाने या प्रकरणी अभिनेत्रीला 26 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. नुकतेच या प्रकरणात तपास यंत्रणेने कोर्टात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनला आरोपी बनवण्यात आले होते. याच आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने अभिनेत्रीला आजच्या सुनावणीत समन्स बजावले आहे.

12 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत

आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला 12 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी पाठवलेल्या समन्सवरही ती हजर झाली नाही. जॅकलिनच्या वकिलाने ती पुढील तारखेला दिल्ली पोलिसांच्या चौकशीसाठी हजर होईल, असे आश्वासन दिले.

215 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने आरोपी बनवले

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या महिन्याच्या सुरुवातीला तिहार तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर सुकेश चंद्रशेखरशी संबंधित सुमारे 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आरोपी म्हणून नाव दिले होते. सुकेशसोबतच्या कथित संबंधांबाबत जॅकलिनची ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनची 12 लाखांची एफडीही जप्त करण्यात आली होती.

सुकेशची भेट घेऊन जॅकलीनच्या अडचणी वाढल्या

ईडीच्या म्हणण्यानुसार सुकेश चंद्रशेखरने खंडणीच्या पैशातून जॅकलिनला करोडो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्या. हे सर्व पैसे सुकेशने गुन्हे करून कमावल्याचे वृत्तात म्हटले आहे. तेव्हापासून जॅकलिन ईडीच्या रडारवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT