Deepika Padukone  Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone: गोल्डन रेशो ऑफ ब्युटीनुसार केलेल्या जगातील टॉप टेन सौंदर्यवतींच्या यादीत दीपिकाचा समावेश

गणितीय सुत्रानुसार बनवली यादी; दीपिका या यादीतील एकमेव भारतीय महिला

गोमन्तक डिजिटल टीम

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोन ही जगातील टॉप टेन सुंदर महिलांच्या यादीत समावेश झालेली एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. विशेष म्हणजे ही यादी एका शास्त्रज्ञाने तयार केली आहे. संपुर्णपणे गणितीय समीकरणावर आधारीत सौंदर्याचे मोजमाप केले गेले आहे.

या यादित पॉप गायिका बियॉन्से, टेलर स्विफ्ट, मॉडेल बेला हदिद, गायिका-अभिनेत्री अॅरियाना ग्रँडे, अभिनेत्री झेंडाया, ब्रिटिश सुपरमॉडेल जॉर्डन डन, कोरियन अभिनेत्री हो युन जुन आणि अमेरिकन टिव्ही पर्सनॅलिटी किम कार्दशियन देखील आहेत. याशिवाय दीपिका ही या यादीतील एकमेव भारतीय महिला आहे. दीपिकाने या यादीत 9 वा क्रमांक पटकावला आहे.

एका शास्त्रज्ञाने ही यादी बनवली आहे. त्यासाठी त्याने गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या नावाने असलेल्या एका प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाचा वापर केला. या रेशोला इंग्रजी Phi (फि) या नावानेही ओळखले जाते.

Jodie Comer

या तंत्रज्ञानाला अद्ययावत कम्युटराईज्ड मॅपिंग स्ट्रॅटेजीचीही त्याने जोड दिली. यात गणितीय पद्धतीनुसार फिजिकल परफेक्शनचा फॉर्म्युला वापरला जातो. हा रेश्यो 1.618 इतका आहे. या स्केलनुसार दीपिका पदुकोन हीला यात 91.22 टक्क्यांसह 9 व्या यादीत आहे.

फि किंवा गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या गणिती सुत्राचा उल्लेख या आधी अभिनेता हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटात देखील आला होता. या चित्रपटात हृतिकने बिहारमधील गणिताचे शिक्षक आनंदकुमार यांची भूमिका साकारली होती.

दरम्यान, दीपिकाच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे तर आगामी काळात ती किंग खानसोबत बहुचर्चित 'पठाण'मध्ये दिसणार आहे. याशिवाय हृतिक रोशनसोबत ती पहिल्यांदाच 'फायटर'मध्ये काम करत आहे. याशिवाय 'द इंटर्न'च्या हिंदी रीमेकमध्ये ती अमिताभ बच्चनसोबत काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT