Deepika Chikhalia Dainik Gomantak
मनोरंजन

Dipika Chikhlia: दिपिका पून्हा सीतेच्या रुपात; चाहते म्हणाले तुम्ही तर आदिपुरुषपेक्षा...

Dipika Chikhlia: आजही चाहते या मालिकेतील पात्रांना रामसीतेचा दर्जा देतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Dipika Chikhlia: आदिपुरुष रिलिज झाल्यापासून चित्रपटावर टीका होत असतानाच आता त्याची तुलना रामानंद सागर निर्मित रामायण मालिकेबरोबर होत आहेत. भलेही रामायण ही मालिका ऑफ एअर होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र आजही चाहते या मालिकेतील पात्रांना रामसीतेचा दर्जा देतात.

मालिकेत रामसीतेची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोव्हील आणि दीपीका चिखलीया याबाबतचे आपले वेगवेगळे अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता आदिपुरुषचा वाद सुरु असतानाच दीपीका चिखलीया यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

काही सेंकदाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहे. दीपीका चिखलीया यांनी सीतेच्या लूकमधील व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत म्हटले आहे की, हा व्हिडिओ चाहत्यांनी केलेल्या डिमांडनंतर तयार केला आहे.

मी जी भूमिका निभावली त्यासाठी मला आजपर्यत जे प्रेम मिळत आलं आहे त्यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली मानते. मला यापेक्षा जास्त काही नको असंही त्यांनी दीपीका चिखलीया म्हटले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी ही रील आदिपुरुषवर भारी पडेल अशा शब्दात कौतुक केले आहे.

दरम्यान, आदिपुरुष चित्रपट रिलिज झाल्यापासून त्यातील संवादामुळे वादात अडकला आहे. देशभरातून देवी देवतांचा अपमान केल्याची टीका चित्रपटावर होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT