Deepika Padukone and Ranveer Singh  Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone: ट्रोल करणाऱ्यांना दीपीकाचे सडेतोड उत्तर; व्हिडिओ झाला व्हायरल

Deepika Padukone: एकीकडे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात असताना दीपीकाचा असा व्हिडिओ तिच्या आनंदी असण्याचे रहस्य असल्याचेदेखील काहीजणांनी मत व्यक्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

Deepika Padukone: मनोरंजन सृष्टीतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे ते कधी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे तर कधी हे कलाकार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपीका पदुकोन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे.

दीपीकाने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात स्वत:लाच खूप सुंदर, वाऊ म्हणताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर रणवीर सिंग, करण जौहर आणि इतरांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत आणि तिचे कौतुकही केले आहे. एकीकडे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात असताना दीपीकाचा असा व्हिडिओ तिच्या आनंदी असण्याचे रहस्य असल्याचेदेखील काहीजणांनी मत व्यक्त केले आहे.

दीपीकाला ट्रोल का केले जात आहे?

कॉफी विथ करण या चॅट शोच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये दीपीका आणि रणवीर सिंग या प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडीने हजेरी लावली होती. त्यावेळी दीपीकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील याबरोबरच रणवीर आणि तिच्या नात्याविषयी काही खुलासे केले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.

काय म्हणाली दीपीका?

लग्नाआधी रणवीर आणि मी एका कॅज्युअल रिलेशन( Relationship )मध्ये होते. त्याआधी मी ज्याप्रकारच्या नात्यात होते, त्यातून बाहेर येण्यासाठी मला वेळ हवा होता. मला काही काळ कोणालाही कोणतेही वचने द्यायची नव्हती. त्यामुळे रणवीर( Ranveer Singh )ला मी कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती. जोपर्यंत मला रणवीरने मला प्रपोज केले नव्हते तोपर्यंत आम्ही कॅज्युअल रिलेशनमध्ये होतो. पण मला या सगळ्यात मजा आली, आनंद मिळाला. असे दीपीकाने म्हटले होते.

दीपीकाचे हे म्हणणे किंवा वागणे अनेकांना पसंतील पडले नाही. नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली होती. मात्र या ट्रोलिंगला अभिनेत्रीने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र तिच्या या व्हिडिओने ट्रोलिंग करण्यांना उत्तर दिल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT