Deepika Padukone Insta/deepika
मनोरंजन

Cannes 2022 Film Festivalमध्ये दीपिका पदुकोणला ज्युरी सदस्यांचा मान

दीपिका पदुकोण 75 व्या कान चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्यांपैकी एक म्हणून भारताचे (India) प्रतिनिधित्व करणार आहे.

दैनिक गोमन्तक

दीपिका पदुकोण 75 व्या कान चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्यांपैकी एक म्हणून भारताचे (India) प्रतिनिधित्व करणार आहे. मंगळवारी रात्री, कान फिल्म फेस्टिव्हलने ज्युरी अध्यक्ष आणि स्पर्धेचे सदस्य ज्युरीची नावे जाहीर करण्यात आली. (Cannes 2022 Film Festival)

यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes 2022 Film Festival) स्पर्धेच्या ज्युरी सदस्यांचा भाग असणार आहे. ज्युरीमध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे, जे या वर्षीच्या पाल्मे डी'ओर पुरस्काराचे विजेते निवडतील. दीपिकासोबत ज्युरीमध्ये अभिनेता-दिग्दर्शक रेबेका हॉल, नूमी रॅपेस आणि इटालियन अभिनेता-दिग्दर्शक जास्मिन त्रिंका, तसेच दिग्दर्शक असगर फरहादी, लाडज ली, जेफ निकोल्स आणि जोकिम ट्रियर आहेत. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन 75 व्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीचे अध्यक्ष असतील. ज्युरी 28 मे रोजी कान येथे एका उत्सव समारंभात यावर्षीच्या विजेत्यांची घोषणा करतील.

2017 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पदार्पण करणाऱ्या दीपिकाने ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते असगर फरहादी, जेफ निकोल्स, रेबेका हॉल, नूमी यांच्यासह इतर ज्युरी सदस्यांच्या फोटोसह तिचाही एक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांसह फॉलोअर्ससोबत ही बातमी शेअर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT