Besharam Rang Copy Of Makeba Dainik Gomantak
मनोरंजन

Besharam Rang Copy Of Makeba: शाहरूख दीपिकाचं 'बेशरम' गाणं वादाच्या भोवऱ्यात; ट्विटरवर युजर्सने केला मोठा आरोप

Besharam Rang Copy Of Makeba: ट्विटरवर यूजर्सने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या बेशरम रंग या गाण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' हे पहिले गाणं रिलीज झाले आहे. हे गाणं दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे. याशिवाय काही यूजर्स सोशल मीडियावर (Social Media) या गाण्याला ट्रोल करत आहेत. हे गाणे अनेक कारणांनी ट्रोल होत असले तरी एक कारण असे आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 'मकेबा'मधून 'बेशरम रंग'चे संगीत चोरले?
    काही ट्विटर (Twitter) युजर्सचे म्हणणे आहे की, 'बेशरम रंग' हृतिक रोशन आणि वाणी कपूरच्या घुंगरू या गाण्यापासून (Song) प्रेरित आहे. त्यात 'रेस 2'चे व्हिज्युअल कॉपी करण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्याच वेळी काही वापरकर्त्यांचा दावा आहे की 'बर्शम रंग' चे संगीत मेकेबा गाण्यावरून कॉपी केले गेले आहे. यासोबतच ट्विटर युजर्सनी याचा पुरावाही शेअर केला आहे.

  • यूजर्सने ट्विटरवर याचा पुरावा शेअर केला आहे
    एका यूजरने लिहिले की, 'बेशराम रंगचे पार्श्वसंगीत मेकेबावरून कॉपी करण्यात आले आहे. त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'जेव्हा मी बेशरम रंग ऐकला तेव्हा मलाही वाटले की मी ही थाप कुठेतरी ऐकली आहे. हे मी माकेबामध्ये ऐकले आहे, हे कळायला मला थोडा वेळ लागला. अशाप्रकारे अनेक यूजर्स या गाण्यावर संगीत चोरीचा आरोप करत आहेत. 'बेशरम रंग'चे संगीत विशाल ददलानी आणि शेखर रिझवानी यांनी दिले आहे.

या दिवशी रिलीज होणार 'पठाण'
शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानने 'पठाण' मध्ये रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम यात खलनायक बनला आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'पठाण' 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT