Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone चे हॉलीवूडमध्ये पुन्हा पदार्पण

सोमवारी एसटीएक्स फिल्म्सचे अध्यक्ष (STXFilms chairman) अ‍ॅडम फोगेलसन यांनी ही घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) एसटीएक्स फिल्म्स आणि टेम्पल हिल यांच्या सहकार्याने त्यांच्या आगामी रोमँटिक कॉमेडीची निर्मिती केली असून, यामध्ये तिने अभिनय केला आहे. 2017 च्या xXx: Return of Xander Cageरिलीजनंतर दीपिका पदुकोण पुढे क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडीमध्ये दिसणार आहे, हा प्रकल्प इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचा (Eros STX Global Corporations) विभाग एसटीएक्सफिल्म्सद्वारे (STXfilms) विकसित केला जात आहे.

सोमवारी एसटीएक्स फिल्म्सचे अध्यक्ष (STXFilms chairman) अ‍ॅडम फोगेलसन यांनी ही घोषणा केली. दीपिकाभोवती केंद्रित असलेल्या चित्रपटाचा विकास करण्यासाठी स्टुडिओ टेंपल हिल प्रॉडक्शन्स वायक गॉडफ्रे आणि मार्टी बोवेन यांच्याशी बोलणी करत आहे. तसेच आयझॅक क्लॉसनर टेम्पल हिलच्या प्रकल्पाची देखरेख करत आहे. “एक कारण आहे की दीपिका भारतातून येणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक अभिनेत्री पैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय सुपरस्टार म्हणून तिचे व्यक्तिमत्व वाढत आहे. अनेक इरॉस इंटरनॅशनल चित्रपटांमध्ये ती घवघवीत यश मिळवत आहे. टेम्पल हिल येथे तिच्या आणि आमच्या मित्रांसोबत एक रोमँटिक कॉमेडी बनवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की हा प्रकल्प आम्हाला भारत आणि न्यूयॉर्कमध्ये संधी देतो असे अ‍ॅडम फॉगेलसन या प्रकल्पाबद्दल म्हणाले.

दीपिका या प्रकल्पाबद्दल उत्सुक आहे.

एसटीएक्सफिल्म्स आणि टेम्पल हिल प्रॉडक्शन्ससोबत भागीदारी करताना मला आनंद होत आहे, हा प्रकल्प एक वेगळी महत्वाकांक्षा आणि दृष्टीकोन निर्माण करतात ही प्रभावी क्रॉस-सांस्कृतिक कथा जगासमोर आणण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे ”पदुकोण यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

सध्या दीपिका पठाणच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे. ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत द इंटर्नच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT