Deepika Padukone in Cannes Festival 2022
Deepika Padukone in Cannes Festival 2022  Dainik Gomantak
मनोरंजन

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीमध्ये झळकणार बॉलीवूडची मस्तानी

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोणची लोकप्रियता भारतातच नाही तर परदेशातही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. नुकतीच ही अभिनेत्री मुंबई विमानतळावर दिसली. दीपिका 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे. दीपिका कान्समध्ये ज्युरी सदस्य म्हणून सहभागी होणार आहे आणि असे करणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. दीपिका आणि तिच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. (Deepika Padukone represents India as Jury Member in Cannes Festival 2022)

16 ते 28 मे दरम्यान या संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण उपस्थित राहणार आहे. फ्रेंच रिव्हिएरामध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका पदुकोण प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय ज्युरीचा भाग बनली आहे. यामध्ये त्याच्यासोबत स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस आणि निर्माती रेबेका हॉल याशिवाय इराणी चित्रपट निर्माता असगर फरहादी देखील सामील होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलने ज्युरी मेंबर्सच्या नावांची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये दीपिकाचे नावही होते. त्याचवेळी मस्तानीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही खुशखबर दिली. फ्रेंच रिव्हिएरामध्ये 17 मेपासून हा महोत्सव सुरू होत आहे. त्याचवेळी व्हिन्सेंट लिंडन यांची या वर्षी ज्युरी अध्यक्षपदी निवड झाली आहे. आता दीपिकाचे चाहते तिला तिथे पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. सलग 10 दिवस दीपिका पदुकोण कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT