Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

'Deepika Padukone मुसलमान आहे...', पठाण वादाच्या भोवऱ्यात; हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Deepika Padukone Is Muslim Lady: बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Deepika Padukone Is Muslim Lady: बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'बेशरम रंग' या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच गदारोळ सुरु आहे. आमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटानंतर शाहरुख खानच्या विरोधात 'बॉयकॉट गँग' सक्रिय झाली आहे. #boycottpathaan हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणच्या विरोधातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या धर्मासंबंधी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

'पठाण' गाण्यावरुन गदारोळ

पठाणच्या 'बेशरम रंग' या पहिल्या गाण्यात दीपिका बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. गाण्याच्या एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची मोनोकिनी घातली आहे, ज्यावर काही राजकारण्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, पाटणा विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) धर्माबाबत वक्तव्य करत आहेत.

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे

चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, कापरींनी कॅप्शन लिहिले की, "#DeepikaPadukone बद्दल नवीन खुलासे करणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाटणा विद्यापीठ तात्काळ बंद केले जावे "

दीपिका पदुकोण एक मुस्लिम महिला आहे

व्हिडीओतील व्यक्तीची ओळख पटलेली नाही, पण तो असे म्हणताना दिसत आहे की, "दीपिका पदुकोण एक मुस्लिम (Muslim) महिला आहे, हाच तिचा खरा धर्म आहे..' यावर रिपोर्टर त्याला दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्याबद्दल विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रिपोर्टरसह इतर लोक हसताना दिसत आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT