Ravindra Jadeja on Urvashi Rautela Dainik Gomantak
मनोरंजन

Ravindra Jadeja on Urvashi Rautela : हा क्रिकेटर झालाय उर्वशी रौतेलाचा दिवाना, म्हणतोय ही सगळ्यात....

खेळाडू आणि अभिनेत्री यांचं नाव जोडलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आता उर्वशी रौतेलासोबत या क्रिकेटरचं नाव जोडलं गेलं आहे.

Rahul sadolikar

Urvashi Rautela ने आजवर रँपवर आणि चित्रपटांमधुन हॉटनेसने आग लावलेली पाहिली आहे. पण आता उर्वशीने क्रिकेटच्या मैदानात आपले चाहते तयार केले आहेत. काही दिवसांपूर्वी क्रिकेटर ऋषभ पंतसोबत उर्वशीचं नाव जोडलं जात होतं आता तर एका नव्या नावाची चर्चा सुरू आहे. आणि हे नाव आहे क्रिकेटर रविंद्र जडेजा.

उर्वशी नेहमीच आपलं सौंदर्य,फॅशन सेन्समुळे चाहत्यांना सरप्राईज देत असते. हेच कारण आहे की ती इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आता रविंद्र जडेजानं उर्वशीला 'सेक्सी' म्हटल्यामुळे ती जोरदार चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आहे

आकर्षक लूक आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्वशीचे जगभरात चाहते आहेत. उर्वशी संदर्भात काही दिवसांपूर्वीच क्रिकेटर जडेजानं तिच्यावर केलेलं स्टेटमेंट तिच्या पॉप्युलॅरीटीचा ग्राफ स्पष्ट करतो. आणि आता उर्वशीच्या फॅन लिस्टमध्ये आणखी एका चाहत्याचं नाव जोडलं जाऊ शकतं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजाला जेव्हा विचारलं गेलं की त्याला सगळ्यात सेक्सी अभिनेत्री कोण वाटते? तेव्हा त्यानं उत्तर देताना चक्क उर्वशी रौतेलाचं नाव घेतलं.

उर्वशी सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. ती लवकरच हॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. उर्वशीला '३६५ डेज' स्टार मिशेल मोरोन सोबत लवकरच आपण पाहणार आहोत. उर्वशीला काही दिवसांपूर्वी आपण मेगास्टार चिरंजीवीसोबत 'वाल्टेयर वैरैया' मधील पार्टी सॉंग मध्ये पाहिलं होतं.

उर्वशी लवकरच राम पोथिनेनीसोबतही दिसेल. तसंच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसणार आहे. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

SCROLL FOR NEXT