Coffee with Karan 8th seoson Dainik Gomantak
मनोरंजन

आता आणखी कुणाची गुपितं उलगडणार? 'कॉफी विथ करन'चा 8 वा सीझन लवकरच...

दिग्दर्शक करन जोहर आता त्याच्या कॉफी विथ करन चा 8 वा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Rahul sadolikar

Coffee with Karan 8 seoson Promo Release : टॉक शोच्या इतिहासातला आजवरचा सगळ्यात मोकळा ढाकळा शो कोणता, असा प्रश्न जर तुम्हाला कुणी विचारला तर तुम्ही पटकन उत्तर द्याल कॉफी विथ करन. निर्माता दिग्दर्शक करन जोहर या शोला होस्ट करतो.

आजवर या शोमध्ये शाहरुख, सलमान आमिर यांसारखे सुपरस्टार याशिवाय करीना, अनुष्का, दीपिका यांसारख्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. आतापर्यंत कॉफी विथ करनचे 7 सीझन झाले असुन आता 8 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

करन आणि त्याचा  कॉन्शन्स

दिग्दर्शक करन जोहरने नुकताच 8 व्या सीजनची घोषणा एका प्रोमोतून केली आहे. करनसोबत या प्रोमोमध्ये त्याचा कोन्सिएनही दिसतो.

दोघांमधला मजेदार संवाद प्रोमोला अजूनच खुमासदार बनवतो. व्हिडिओमध्ये, तो सोफ्यावर झोपलेला दिसतो, जेव्हा त्याचा ' कॉन्शन्स' त्याला भेटायला येतो. 

करन आणि कोन्सिएनमधला संवाद

कॉफी विथ करनच्या प्रोमोमध्ये करनचा त्याच्या कोन्सायन्ससोबतचा मजेशीर संवाद असा आहे. आपल्या  कॉन्शन्सला पाहुन करन दचकतो आणि विचारतो "गेल्या सीझनमध्ये माझ्या कॉफीमध्ये कोणीतरी काहीतरी ठेवले होते का?" यावर त्याचा कॉन्शन्स त्याला सांगतो लास्ट सीजनला तुझ्या कॉफीत कुणीतरी काहीतरी ठेवले होते? "तू याला कोल्ड कॉफी विथ करण म्हणू शकतोस," . 

तो पुढे म्हणतो, "तुमच्या नेपो मुलांसोबतचे ते 'चीज' विनोद आणखी मजेदार असायला हवे होते का? प्रत्येक भाग सारखाच होता. एक 50 वर्षांचा माणूस 20 वर्षांच्या तरुणांना त्यांच्या लैंगिक आयुष्याबद्दल विचारतो. तुला तुझं सेक्स लाईफ नाही का?"

नवविवाहितांना बोलावणार

कॉन्शन्ससोबतच्या चर्चेत करण जोहर म्हणतो, "मी शहरातील सर्वात नवीन विवाहित जोडप्याला आमंत्रित करणार आहे," ज्यावर त्याचा कॉन्शन्स उपहासाने विचारतो, "आणि त्यांच्यासोबत तू रॅपिड फेरे घेणार का?" यावर करन पुढे म्हणतो "मी स्टार किड्स म्हणणार नाही, मी त्यांना स्टार ग्रँडकिड्स म्हणेन. मी क्रिकेटपटूंना आमंत्रित करेन! नाही, कधीच नाही."

प्रोमो शेअर करताना करणने लिहिले, "झाले, आता माझी स्वतःचा कॉन्शन्स मलाही ट्रोल करू इच्छित आहे! पण त्याला काय वाटते त्याकडे दुर्लक्ष मी अजूनही सीझन 8 तयार करत आहे!" त्यानंतर त्याने लिहिले की कॉफी विथ करण सीझन 8 डिस्ने + हॉटस्टारवर 26 ऑक्टोबरपासून दिसणार आहे .

कोणतेही फिल्टर नसलेले संभाषण

दिग्दर्शक आणि शो अँकर, करण जोहर म्हणाला, “आम्हा सर्वांना माहित आहे की तुम्ही कॉफी विथ करणच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहात म्हणूनच तुमच्या शुभेच्छा ऐकल्या गेल्या आहेत! 

सीझन 7 मधील प्रचंड प्रतिसाद आणि अनेक अंदांजांनंतर, या सीझनमध्ये माझ्या मित्रांना आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींना कुप्रसिद्ध कॉफी सोफ्यावर कोणतेही फिल्टर नसलेल्या संवांदांसह त्यांचे सिक्रेट्स सगळीकडे पसरवूया. 

आता करनच्या कॉफीच्या या नव्या कपला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं खूपच मजेशीर असणार आहे.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT