'कोड नेम तिरंगा' या नावावरूनच कळते की ही कथा एका एजंटची आहे जी देशासाठी मिशनवर जाणार आहे; पण यावेळी नायिका मिशनवर जाणार नाही आणि हीच या चित्रपटाची खासियत आहे. चित्रपटातील कलाकार चांगले आहेत, पण चित्रपट बघून असे वाटते की हे सर्व पाहिले आहे. याआधीच्या अशा चित्रपटामधून अशी कथा पाहिली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
(Code Name Tiranga Review )
कथा
ही कथा आहे दुर्गा नावाच्या एजंटची जी परदेशात मिशनवर आहे. ही व्यक्तिरेखा परिणीती चोप्राने साकारली आहे. एका दहशतवाद्याला पकडण्याचे मिशन आणि या मिशनदरम्यान ती हार्डी संधूला भेटते आणि जे घडते तेच चित्रपटात दाखवले आहे.
साहजिकच मिशन पूर्ण होते. असे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत आणि हे पाहून असे वाटते की हे सर्व पाहिले आहे आणि हीच या चित्रपटाची कमतरता आहे.
अभिनय
परिणीती चोप्राने या चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. ती अॅक्शन अवतारात दिसत आहे. ती बुरखा घालून अॅक्शन करते तेव्हा तिला पाहणे रोमांचकारी वाटते. परिणीतीने इमोशनल सीन्सही उत्तम केले आहेत. हे पाहून परिणितीने घेतलेली मेहनत स्पष्ट दिसून येते. त्याचबरोबर हार्डी संधूने त्याची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे.
तो तुम्हाला कुठेही पंजाबी गायक किंवा अभिनेत्याचा फील देत नाही, ना लूकमध्ये ना डायलॉग डिलिव्हरीत. शरद केळकर मुख्य खलनायक बनला असून त्याची स्क्रीन प्रेझेन्सही अप्रतिम आहे. रजित कपूरनेही उत्तम काम केले आहे आणि दिव्येंदू भट्टाचार्यनेही उत्तम अभिनय केला आहे. यात प्रत्येकाचा अभिनय चांगला आहे, पण एवढ्या दमदार कलाकारांना ज्या प्रकारचे संवाद आणि कथा दिली आहे ते मात्र अपुरे वाटत आहे.
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. त्याचबरोबर संगीतही चांगले आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची कथा. पाहणाऱ्यांना आणखी काही ट्विस्ट आणि वळणांची अपेक्षा होती पण ते चित्रपटात दिसत नाही.
दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी असा चित्रपट बनवण्यापूर्वी जास्त मेहनत करायला हवी होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.