दोन तरुण दिग्दर्शकांची सिनेमा निष्ठा  Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI: दोन तरुण दिग्दर्शकांची सिनेमा निष्ठा

राहुलने बनवलेला ‘सुनापट’(Sunapat) ह्या गढवाली या भाषेतल्या पहिल्या लघुपटाला (Short Film) यंदाच्या इफ्फीत (IFFI) स्थान मिळाले.

दैनिक गोमन्तक

राहुल रावत हा स्वतः उत्तराखंडचा. तिथल्या गावात लोकांना भोगाव्या लागणाऱ्या कष्टप्रद आयुष्याची कल्पना त्याला होती. स्थलांतर एक वैश्विक समस्या आहे. उत्तराखंडला (Uttarakhand) जरी 2001 साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला असला तरी ते राज्य अजून मागासलेले आहे. वीस वर्षे उलटून गेली आहेत आणि तरीसुद्धा स्थलांतर होणे थांबलेले नाही. सरकारी आकडेवारीनुसार जवळजवळ 1500 खेडी स्थलांतरामुळे भूताटकीसदृश्य गावे बनली आहेत. लोकांनी डेहराडून, दिल्ली, मुंबई (Mumbai) अशा शहरांचा आसरा घेतलेला आहे. गावची संस्कृती आणि तिथला समाज दोन्ही हरवून जात आहे. या साऱ्या कारणांमुळे त्याला या विषयावर चित्रपट (Movie) बनवावे असे वाटले.

राहुलने बनवलेला ‘सुनापट’(Sunapat) ह्या गढवाली या भाषेतल्या पहिल्या लघुपटाला (Short Film) यंदाच्या इफ्फीत (IFFI) स्थान मिळाले. हा लघुपट (Short Film) त्याला त्याच्या गावाविषयी वाटणाऱ्या तळमळीची फलश्रुती होती. राहुलने दिल्लीच्या एका संस्थेमधून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर तो अमित शर्मा (‘बधाई हो’ या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक) यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करू लागला. अमित शर्मा यांच्या निर्मिती विभागात गेली सात वर्षे काम करताना त्याला योग्य तो अनुभव आणि धाडस मिळाले आणि त्याने स्वतःचा हा चित्रपट (Movie) करायचे ठरवले.

राहुल म्हणतो, सूनपट (Sunapat) म्हणजे शांतता. गावातली उदासीन शांतता, जी लोकांच्या स्थलांतरामुळे गावात तुम्बून राहिली आहे. राहुलला ही शांतता लोकांपर्यंत, दर्शकांपर्यंत न्यायची होती. गावात निर्माण झालेलीती स्तब्ध पोकळी त्याला इतरांना दाखवायची होती. इफ्फी (IFFI) राहुलला एखाद्या स्वप्नासारखी वाटते. आपण इथवर येऊ शकेन याची ती त्याने कधी कल्पनाच केली नव्हती. आपल्या राज्याच्या समस्या आपण लोकांसमोर मांडू शकलो याचे समाधान त्याला आहे कोणतेही अभिनेते न घेता, वीस दिवस उत्तराखंडच्या (Uttarakhand) पहाडामधून त्यांनी शूटिंग केले. प्रकाश योजनेची समस्या मोठी होती. केवळ दोन एलईडी लाइट्स (LED lights) वापरून त्यांनी आपले शूटिंग (Shooting) पूर्ण केले आहे.

कन्नड चित्रपट ‘तलेदण्ड’चा दिग्दर्शक प्रवीण कृपाकर देखील असाच ‘विषया’ने झपाटून गेलेला. सात वर्षे तो या सिनेमाच्या (Movie) पटकथेवर काम करत होता. त्यानंतर दोन वर्षे सिनेमा तयार करण्यात गेली. अशातऱ्हेने त्याच्या 9 वर्षांच्या अथक श्रमाचे फळ होते. ही त्याची ‘डेब्यू’ फिचर फिल्म. हा चित्रपट (Movie) निसर्गावर आधारित आहे. प्रवीण म्हणतो, या ‘या निसर्गावर आणि पृथ्वीवर माझे निस्सीम प्रेम आहे. माझ्या कॉलेजच्या दिवसापासूनच निसर्गाचा अभ्यास करायला मी सुरुवात केली. समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. सिनेमा या माध्यमाचे मला आकर्षण होतेच. माझे दोन आवडते विषय, ‘सिनेमा’ आणि ‘निसर्ग’ यांना एकत्रित आणण्याचे फलित म्हणजे माझा हा प्रथम चित्रप-‘तलेदण्ड’!

प्रवीणचा ‘तलेदण्ड’ एका खऱ्याखुऱ्या वेड्या माणसावर आधारलेला आहे. हा पस्तिशीतला, मानसिक रुग्ण असणारा माणूस बेंगलोरमधल्या रस्त्यांवर प्लास्टिकचा कचरा उचलायचा. झाडांची रोपे उन्मळलेली दिसली की ती पुन्हा जमिनीत रोवायचा. सिनेमात (Movie) ही भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते संचारी विजय यांनी केली आहे. दुर्दैवाने संचारी विजय तीन महिन्यांपूर्वी एका अपघातात मरण पावले. प्रवीणला देखील राहुलप्रमाणेच त्याला अतिशय आवडणाऱ्या विषयाबद्दलची उत्कटता आणि सिनेमा या दोन्ही गोष्टींनी वाट दाखवली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला (Movie) मिळालेल्या सन्मानाने तो फार आनंदित झाला होता.

सिनेमा (Movie) बनवणे ही मानसिक प्रक्रियादेखील असते. एकदा तो बनवायचे ठरवल्यानंतर त्यासाठी लागणारी साधने ही दुय्यम बनतात. ‘विषय’ आणि ‘सिनेमा बनविण्याची प्रबळ प्रेरणा’ या दोनच गोष्टी सिनेमा पूर्ण करण्यात सर्वात अधिक सहाय्यकारी ठरतात. राहुल रावत आणि प्रवीण कृपाकरकडे या दोन्ही गोष्टी होत्या म्हणून त्यानी आपली कहाणी आणि भाषा या दोन्ही गोष्टी त्याना इफ्फीत (IFFI) सन्मानपूर्वक घेऊन आल्या. ‘सुनपट’ आणि ‘तलेदण्ड’ हे दोन्ही चित्रपट (Movie) त्यांच्या दिग्दर्शकांच्या तळमळीची आणि कष्टातून साध्यापर्यंत जाणाऱ्या वाटेचीची कहाणी सांगतात.

- सतिंदर मोहन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

SCROLL FOR NEXT