Shivaji Satam  Dainik Gomantak
मनोरंजन

सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न यांनी केला धक्कादायक खुलासा

खुद्द अभिनेत्याने नुकतेच आपल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

दैनिक गोमन्तक

आज प्रेक्षक बॉलिवूड आणि टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांना त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर एसीपी प्रद्युम्न या नावानेही ओळखतात. 'सीआयडी' या टीव्ही सीरियलमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारून त्यांनी 23 वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. शिवाजी साटम यांनी सीआयडी (CID) व्यतिरिक्त 'वास्तव', 'नायक', 'सूर्यवंशम' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये (Films) आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना चकित केले आहे. पण खर्‍या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती एसीपी प्रद्युम्न या व्यक्तिरेखेतून. पण आज एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम (Shivaji Satam) यांच्याकडे काम नाही. खुद्द अभिनेत्याने नुकतेच आपल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. (Bollywood News In Marathi)

ACP प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांच्याकडे काम नसल्याचा खुलासा करताना त्यांच्या त्रासाबद्दल सांगितले. शिवाजी मुलाखतीत म्हणाले, 'मला प्रचंड काम मिळत आहे, असे मी म्हणू शकत नाही. काम नाही तर नाही. माझ्याकडे आलेले अर्धे रोल काही खास नाहीत. मी मराठी रंगभूमीचा आहे आणि माझ्या आयुष्यात फक्त अशाच प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे ज्याचा मला आनंद होतो. आज अधिक सशक्त पात्रे लिहिली जात नाहीत ही माझ्यासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे आणि हे सर्व बाजूंनी नुकसान आहे.

ते पुढे म्हणाले, 'काम न मिळाल्याने मला घरी बसून कंटाळा करावा लागतो. त्याचबरोबर एक अभिनेता म्हणून मला माझ्या कामाची उणीव भासत आहे आणि आजही प्रेक्षक चांगले काम आणि चांगल्या कलाकारांना मुकतात. आज मला जे काही छोटे काम मिळत आहे, तिथे मला पुन्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिका मिळत आहेत. पण आता मला अशा प्रकारची भूमिका करायची नाही जी मी गेली 20 वर्षे करत होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT