Ananya Pandey Dainik Gomantak
मनोरंजन

अनन्या पांडेला कपड्यावरून ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेंचे चोख उत्तर

एक आई-वडील म्हणून आम्ही नेहमीच तिला विचारांचे स्वातंत्र्य दिले आहे; चंकी पांडे

दैनिक गोमन्तक

Ananya Pandey : बॉलीवूडमधील अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल केले जाते. काही चाहते त्यांचे कौतुक करतात तर काहीजण त्यांना ट्रोल करतात. चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी वेळातच बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा तयार केली आहे. मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसलेली अनन्या पांडे (Ananya Pandey) सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे बरीच सक्रीय असते.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी अनन्या या व्यतिरिक्त तिच्या फॅशनमुळेही चर्चेत राहते. बरेचदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलही केले जाते. अलिकडेच एका पार्टीमध्ये परिधान केलेल्या गाऊनमुळे अनन्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. मात्र त्यावर तिचे वडील चंकी यांनी ट्रॉलर्सना चांगलेच सुनावले आहे. (Chunky Pandey's exact answer to those who trolled Ananya Pandey from her clothes)

अनन्याने कोर्सेट बॉडीसूटसह बॅक थाइ-हाय स्लिट शीयर ड्रेस परिधान केला होता. पण जेव्हा या ड्रेसमधील तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले तेव्हा मात्र यावरून तिच्यावर टीका करण्यात आली. काही लोकांनी अनन्याचा ड्रेसिंग सेन्स खूपच वाईट आहे असे म्हटले. यावर तिचे वडील चंकी पांडे म्हणाले, ‘एक आई-वडील म्हणून आम्ही नेहमीच तिला विचारांचे स्वातंत्र्य दिले आहे. तिने कोणते कपडे परिधान करावेत किंवा कोणते नाहीत याबाबत आम्ही कधीच तिला सल्ला दिला नाही. दोन्ही मुलींना आम्ही खूप चांगली शिकवण दिली आहे आणि त्या खूप समजूतदार आहेत.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT