Christmas Special Movies Dainik Gomantak
मनोरंजन

Christmas Movie List: ख्रिसमस डे खास बनवण्यासाठी 'हे' चित्रपट नक्की पाहा

Puja Bonkile

Christmas Movie List: जगभरासह भारतातही ख्रिसमस साजरा करण्याचा ट्रेंड वाढला आहे. काही लोक या दिवशी ट्रिपला जाण्याचा प्लॅन करतात तर काहीजण कुंटूंबासह घरीच त्याचा आनंद घेतात. तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत घरी ख्रिसमस साजरा करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही काही नवे चित्रपट पाहू शकता.

  • द आर्चीज

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसह अनेक स्टार किड्सने 'द आर्चीज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चाहते स्टारकास्टला भरभरून प्रेम देत आहेत. द आर्चीज चित्रपटाची कथा मैत्री आणि रोमान्सभोवती फिरते. या चित्रपटासह ख्रिसमस डे खास पद्धतीने साजरा करू शकता.

  • डंकी

शाहरुख खानचा डंकी चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून शाहरुख आणि तापसीची जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. डंकी चित्रपटात तुम्हाला कोणत्याही ग्लॅमरशिवाय एक डाउन-टू-अर्थ कथा पाहायला मिळेल. ख्रिसमस डेला हा चित्रपट पाहू शकता.

रेट्रो अंदाजामध्ये करा ख्रिसमस साजरा

तुम्हाला लेटेस्ट चित्रपट पाहायचे नसतील आणि काहीतरी रेट्रो चित्रपट पहायचे असेल, तर तुम्ही दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सारखे चित्रपट देखील पाहू शकता. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलची दमदार जोडी पाहायला मिळेल. विशेषत: संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासाठी हा चित्रपट चांगला पर्याय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT