Chitra wagh Urfi Javed Dainik Gomantak
मनोरंजन

Chitra Wagh: ऊर्फी जावेद - चित्रा वाघ यांच्यातला वाद थांबता थांबेना..नेटकऱ्यांचे मात्र मनोरंजन

अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

Rahul sadolikar

Chitra Wagh Comment On Urfi Javed : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि बिग बॉस ओटीटी फेम सेलिब्रेटी उर्फी जावेद यांच्यातला वाद रोज नवेनवे वळण घेत आहे. काल तर उर्फीने चित्रा वाघ यांचा एकेरी उल्लेख करुन हा वाद तिच्याकडुन सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.चित्रा वाघ यांनी उर्फी हिच्या कपड्यावरुन मोठी टीका केली होती. तीच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

चित्रा वाघ यांनी उर्फीला कपडे घालण्याच्या बाबतीत भान ठेवायला हवं असं सल्ला दिला होता. उर्फीला महाराष्ट्रात राहायचे तर कपड्यांची मर्यादा पाळायला हवी असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

उर्फीने हे नाही ऐकलं तर कानशीलात लगावण्याची भाषाही चित्रा वाघ यांनी केली होती. यानंतर भाजपच्या महिला संघटनेकडुन उर्फीच्या घराबाहेर निदर्शनही करण्यात आली होती. यावर गप्प बसेल ती उर्फी कसली? आपला झालेला अपमान बघुन उर्फी पेटुन उठली. उर्फीच्या अतरंगी प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांना मनोरंजनाला मात्र विषय मिळाला.

उर्फीनं कालच चित्रा वाघ यांच्या जखमेवरची खपली काढण्याचाच प्रकार केला आहे. तिने चित्रा वाघ यांना संजय राठोड आठवतात का, आता तर ते तुमचे मित्र झाले आहेत असं म्हणुन त्यांना डिवचलं होतं.

एवढं करुन ती शांत बसली नाही तर पुढे जात चित्रू आपण चांगल्या मैत्रीणी होऊ शकतो असंही ती म्हणाली. यावर साहजिकच चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया अपेक्षित होती.लगेच त्यांनी ट्विट करत उर्फीला इशारा दिला.

चित्रा वाघ यांनी केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. त्यामध्ये त्या म्हणतात , भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?

मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीने केलेलं हे शरीरप्रदर्शन अतिशय बिभत्स आहे. हे ट्वीट करताना त्यांनी राज्य महिला आयोगाला टॅगही केलं आहे. कायदा कायद्याचं काम करेलच ;पण महिला आयोग काही करणार की नाही ? असं विचारलं आहे.

सोशल मिडीयावर हा वाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या वादाचा शेवट लवकर होईल असं काही सध्याचं चित्र नाही. बघू आता या वादात नेमकं काय होणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT