Ram Charan-Upsana-Chiranjeevi Dainik Gomantak
मनोरंजन

Ram Charan-Upasana Baby Girl: लग्नाचा 11 वर्षांनंतर रामचरण-उपसना यांना कन्यारत्न! आजोबा चिरंजीवींचा आनंद गगणात मावेना

Ram Charan-Upsana Babygirl: हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासनाने मुलीला जन्म दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Ram Charan-Upsana Babygirl: साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी आज आजोबा बनले आहेत. त्यांचा सुपरस्टार मुलगा रामचरण याला मुलगी झाली आहे. या खास क्षणी त्यांच्या संपूर्ण कुटुंब आनंदात बुडाले असून लग्नाच्या 11 वर्षानंतर रामचरण आणि उपसना यांच्या घरी छोटी परी जन्माला आली आहे. या आनंदाच्या क्षणी मेगास्टार चिरंजीवी यांनी आपल्या नातीसाठी एक खास पोस्ट शेअर करत तिचे स्वागत केले आहे.

चिरंजीवीने आजोबा झाल्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर करून साजरा केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या घरात छोट्या परीचे स्वागत केले आहे. ते या पोस्टमध्ये म्हणतात- 'लिटल मेगा प्रिन्सेस तुझं स्वागत आहे! तुझ्या आगमनाने आपल्या परिवारात आनंदाचे उधाण आले आहे. राम चरण आणि उपासना आई-बाबा आणि आम्हा आजी-आजोबांचे बनल्याचा आनंद आणि अभिमान आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर चिरंजीवी यांनी केली आहे.

11 वर्षांनंतर उपासना बनली आई

गेल्या बऱ्याच दिवसांपासून उपासनाच्या आई होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अलीकडेच राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. राम चरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी विवाहबंधनात अडकले होते. आता या जोडप्याच्या घरात एक छोटीशी परी देखील सामील झाली आहे. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपासनाने मुलीला जन्म दिला आहे.

साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी आता आजोबा आणि पत्नी सुरेखा या आजी बनल्या आहेत. ही बातमी आल्यानंतर राम चरण आणि उपासना यांच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी राम चरणचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. या जोडप्याने डिसेंबर 2022 मध्ये सर्वांना ही आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून या जोडप्याच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर होती. आता इतक्या दिवसांनी दोघांच्या घरी लहान बाळाचे आगमन झाल्याने त्यांच्या कुटुंबातच नव्हे तर चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT