Fighter Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection: क्रिती-शाहिदची बॉक्स ऑफीसवर धमाल तर दिपीका-हृतिकची झाली निराशा

Box Office Collection: 250 कोटींच्या प्रचंड बजेटमुळे हा चित्रपट 211 कोटींचा निव्वळ कलेक्शन करूनही 'हिट' होऊ शकला नाही.

दैनिक गोमन्तक

Box Office Collection fighter movie kriti senon shahid kapoor teri baaton mein aisa uljha jiya

सध्या थिएटरमध्ये बॉलीवू़डचे अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. चला तर जाणून घेऊयात या चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर काय स्थिती आहे.

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या यामी गौतमचा 'आर्टिकल 370' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असताना, विद्युत जामवालचा 'क्रॅक' फ्लॉप झाला आहे. याशिवाय थिएटरमध्ये आधीच रिलिज झालेला 'फायटर' त्याच्या ५व्या वीकेंडमध्ये काही खास दाखवू शकला नाही. 250 कोटींच्या प्रचंड बजेटमुळे हा चित्रपट 211 कोटींचा निव्वळ कलेक्शन करूनही 'हिट' होऊ शकला नाही. मात्र, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ने 17 व्या दिवशी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. या आठवड्यात हा चित्रपट आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई करेल.

सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेला 'फाइटर' बॉक्स ऑफिसवर 'पठाण'सारखी जादू दाखवू शकलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या 32 दिवसांत चित्रपटाने देशात 211.10 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे, तर जगभरात चित्रपटाने 353.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ने तिसऱ्या वीकेंडमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे. शुक्रवारी 2.5 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी 2.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे, 17 दिवसांत या चित्रपटाने देशात एकूण 73.55 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अमित जोशी आणि आराधना शाह यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे बजेट ७५ कोटी रुपये आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने जगभरात १२५ कोटीची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT