'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

Subhash Shirodkar: सुभाष शिरोडकर म्हणाले की, एनपीए वाढल्यामुळे बँका डबघाईला आल्यावर ग्राहकांचे पैसे बुडतात. आतापर्यंत राज्यात पाच बँका आणि पतसंस्था बुडाल्या आहेत. ही मालिका पुढे सुरू राहू नये यासाठी सहकार खात्याने कडक पावले उचलली आहेत.
Subhash Shirodkar At National Cooperative Week Program by Thrift Association
Subhash ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

Subhash Shirodkar At National Cooperative Week Program by Thrift Association

फोंडा: एनपीए वाढीमुळे आणि नियोजनाअभावी बँका डबघाईला येत असल्याने पुढील काळात सहकार खात्यातर्फे कठोर निर्णय घेतले जातील. त्यासाठी सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे, असा इशारा सहकारमंंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला.

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज थ्रिफ्ट असोसिएशनतर्फे राष्ट्रीय सहकार सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, अनिवासी भारतीय आयुक्त तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फलदेसाई, थ्रिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, कार्यकारी अधिकारी एस. एन. भगत तसेच प्रमुख वक्ते प्रा. सुब्रमण्यम भट व आठ पगारदार सोसायट्यांचे प्रतिनिधी कमलाकांत देसाई, उमाकांत नाईक, हेमंत कासार, आरती नाईक, सरोजनी कोमरपंत, दत्ताराम मयेकर, अनिल आर्लेकर व बाबू उपार्डेकर आदी उपस्थित होते.

सुभाष शिरोडकर म्हणाले की, एनपीए वाढल्यामुळे बँका डबघाईला आल्यावर ग्राहकांचे पैसे बुडतात. आतापर्यंत राज्यात पाच बँका आणि पतसंस्था बुडाल्या आहेत. ही मालिका पुढे सुरू राहू नये यासाठी सहकार खात्याने कडक पावले उचलली आहेत. बँका आणि पतसंस्थांचे कार्य निर्धोकपणे सुरू रहावे यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा असून त्याचा अभाव होत असल्यानेच या बँका डबघाईला येत आहेत. पुढील दोन महिन्यांत सहकार खात्याकडून कठोर उपाययोजना केली जाईल, त्यासाठी सर्वांनी तयार रहावे.

नरेंद्र सावईकर यांनीही सहकार चळवळीचा कमकुवत घटकांना लाभ मिळायला हवा असे नमूद करताना सहकार क्षेत्राची आवड आणि तळमळ असलेल्या व्यक्तींकडून हे काम पुढे न्यायला हवे. युवा पिढीचा जास्तीत जास्त अंतर्भाव करताना हे काम प्रामाणिकपणे पुढे कसे नेले जाईल याकडे कटाक्ष ठेवायला हवे, असे सांगितले.

प्रा. सुब्रमण्यम भट यांनी सहकार चळवळीत सामाजिक समरसता कशी येईल याकडे कटाक्ष ठेवताना विकसीत भारत घडवण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. उल्हास फळदेसाई यांनीही आपले विचार व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग कुर्टीकर यांनी, तर प्रिया टांगसाळी यांनी सूत्रसंचालन केले.

रेशन हवे दारात...

गेली अनेक वर्षे रेशनसाठी विशेषतः महिला रांगा लावत आहेत, रेशनचे धान्य घेताना आणि ते घरी नेताना विशेषतः वयोवृद्धांची होणारी मानसिक कुचंबणा मी पाहिली आहे, असे सांगताना विकसीत भारतात यापुढे रेशन तुमच्या दारी ही संकल्पना सरकारने राबवावी ज्यामुळे लोकांना रेशनसाठी दुकानांसमोर रांगा लावाव्या लागणार नाही, असे सुभाष शिरोडकर म्हणाले.

Subhash Shirodkar At National Cooperative Week Program by Thrift Association
Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

शिरोड्यात ड्रोन सेंटर...

विज्ञानाच्या नवनवीन संकल्पनांचा अंगिकार करताना संशोधनाला महत्त्व द्यायला हवे. विद्यार्थ्यानी त्यादृष्टीने लक्ष केद्रीत करावे असे आवाहन करताना शिरोड्यात पुढील दोन महिन्यात ड्रोन सेंटर उभारण्यात येईल, त्यामुळे नव्या संशोधनाला वाव मिळेल अशी माहिती सुभाष शिरोडकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com