Box Office Collection  Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection 2022 : यावर्षी कुठला चित्रपट हिट ठरला कुठला फ्लॉप गेला?

2022 साली बॉक्स ऑफिसवर काही चित्रपट चालले तर काही आपटले...

गोमन्तक डिजिटल टीम

सरता सरता वर्ष कसं सरलं कळलंही नाही. अनेक चांगल्या वाईट आठवणी 2022 आपल्यासाठी मागे ठेवुन जात आहे. 2022 हे साल प्रत्येक व्यक्तीला सारखंच गेलं असेल असं नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीतही सगळ्याच चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. कित्येक चित्रपटांनी भरपूर गल्ला कमवला तर कित्येक चित्रपट वाईटरित्या आपटले. चला तर मग 2022 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आढावा घेऊया.

अजय देवगन, तब्बू आणि अक्षय खन्ना स्टारर चित्रपट दृश्यम 2 ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.। दृश्यम 2 ने बॉक्स ऑफिसवर जगभरात 322 पेक्षा जास्त कमाई केली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित दृश्यम 2 अजय देवगनच्याच वर्ष 2015 सालच्या दृश्यमचा सीक्वल आहे. याचबरोबर विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मिर फाईल्स' यावर्षीचा हिट ठरला.

आर. माधवनचा रॉकेट्री द नंबी इफेक्ट, वरुण धवनचा जुग जुग जियो, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर चा एक विलेन रिर्टन्स हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत.

बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी हे वर्ष काही विशेष नव्हतं. 2022 या वर्षात अक्षय कुमारचे चित्रपटही आपला प्रभाव दाखवु शकले नाहीत. याच वर्षी अक्षय कुमारचे बच्चन पांडे, ऐतिहासिक कथेवर आधारित असणारे सम्राट पृथ्वीराज ,रामसेतु आणि रक्षाबंधन हे चित्रपट तर कधी आले आणि कधी गेले हे कळलंही नाही.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 'लाल सिंह चड्डा' च्या माध्यमातुन चार वर्षांनी परतला होता.या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर हे मुख्य भुमिकेत होते तर मोना सिंह आणि नागा चैतन्य हे सुद्धा महत्त्वाच्या भुमिकेत दिसले. पण 'लाल सिंह चड्डा'ला बॉयकॉटचा सामना करावा लागला. या चित्रपटाला काही विशेष कमाई करता आली नाही.

आयुष्मान खुरानाच्या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर सपाटुन मार खाल्ला. अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो, अनेक, आणि डॉक्टर जी हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरीत्या फ्लॉप झाले.

रणवीर सिंहचा जयेश भाई जोरदार, रणबीर कपूर चा 'शमशेरा', ऋतिक रौशन-सैफ अली खान चा 'विक्रम वेधा', अजय देवगनचा रनवे 34, थॅंक गॉड, राजकुमार रावचा बधाई दो, शाहिद कपूरचा 'जर्सी, जॉन अब्राहम चा 'अटैक', टाइगर श्राफचा 'हीरोपंती 2', सनी देओलचा 'चुप', कैटरीना कैफचा फोन भूत, कंगना रनौतचा धाकड, काजोलचा सलाम वेंकी, वरुण धवनचा 'भेडिया', जान्हवी कपूरचा 'मिली' सारखे कितीतरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट पद्धतीने पडले.

कमर्शियल चित्रपटांचा हुकमी एक्का समजला जाणारा रोहित शेट्टीचा सर्कसही बॉक्स ऑफिवर ढिम्म पडला. थोडक्यात रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र,अजय देवगनचा दृश्यम सोडता बॉक्स ऑफिसवर 2022 साली कुणालाच विशेष कमाल दाखवता आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT