Swara Bhaskar Marriage Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhaskar Wedding: शुभमंगल सावधान! स्वरा भास्करने 'या' मुस्लिम नेत्याशी केलं कोर्ट मॅरेज

स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती.

Manish Jadhav

Swara Bhaskar Marriage: स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या व्यक्तीगत आयुष्यात 'पॉलीट‍िकल एन्ट्री' झाली आहे. स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली आहे.

दरम्यान, स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. स्वरा भास्करने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिची आणि फहादची संपूर्ण प्रेमकथा सांगताना दिसत होती.

दोघांनी 6 जानेवारीला स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नाची (Marriage) नोंदणी केली होती. लग्नानंतरच्या एका फोटोमध्ये स्वराही रडताना दिसत आहे.

दुसरीकडे, जानेवारीमध्ये स्वराने आपला 'मिस्ट्री मॅन' बनवून जगासमोर ज्याची ओळख करुन दिली, तो दुसरा कोणी नसून स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद आहे. याआधी स्वरा भास्कर आणि लेखक हिमांशू शर्मा डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

मात्र, 2019 मध्ये या दोघांच्या ब्रेकअपची चर्चाही समोर आली होती. स्वरा शेवटची 'जहां चार यार' चित्रपटात (Movie) दिसली होती. हा चित्रपट 16 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT