The Kashmir Files  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files: ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट म्हणजे कचरा! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकांची टीका

The Kashmir Files Controversy: हा चित्रपट अनेक वादामुळे चर्चेत आला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला ‘कचरा’ म्हटले आहे. या चित्रपटावर टीका करताना त्यांनी म्हटले की, ‘हा बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये. तर, लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे.’ एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सईद अख्तर मिर्झा यांनी म्हटले की, या चित्रपटातील (Movie) मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण काश्मिरी पंडितांना भेडसावणाऱ्या समस्या या खऱ्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सईद मिर्झा म्हणाले की, ‘माझ्यासाठी काश्मीर फाईल्स म्हणजे कचरा आहे.’ यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की, मग काश्मिरी पंडितांचा मुद्दा देखील कचरा आहे का? त्यावर मिर्झा म्हणाले की, ‘नाही हा मुद्दा अगदी वास्तविक आहे. पण, फक्त काश्मिरी हिंदूच याचे बळी ठरले आहेत का? नाही, असे अनेक मुस्लिम लोकही आहेत, जे विविध प्रकारच्या अडचणीत अडकले आहेत. ही बाजू घेण्याची गोष्ट नाही, माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.’

सईद अख्तर मिर्झा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. सईद मिर्झा यांनी 'मोहन जोशी हाजीर हो', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है', 'सलीम लंगडे पे मत रो' आणि 'नसीम' सारखे चित्रपट (Movie) केले आहेत. त्यांनी 'नुक्कड' आणि 'इंतजार' या टीव्ही मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. विवेक अग्निहोत्रींचा 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट ठरला होता. तसेच, हा वर्षभरातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराचे चित्रण करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांचा छळ आणि त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले होते. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘द काश्मीर फाईल्स’ हा 2022 सालातील सुपरहिट हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT