Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Name Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Name: रणबीर-आलियाच्या कन्येच्या नावाचे आहेत अनेक अर्थ, तुम्हाला माहिती आहेत का?

आजी नीतू कपुर यांनी केले नातीचे नामकरण

Akshay Nirmale

Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Name: बी टाऊनमधील चर्चेतील कपल असलेल्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या कन्येचा नामकरण सोहळा पार पडला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि या मुलीच्या आज्जीबाई नीतू कपूर यांनी त्यांच्या नातीचे नामकरण केले आहे.

आलिया भट्टने सोशल मीडियात एक लांबलचक पोस्ट टाकून मुलीच्या नामकरणाची माहिती दिली आहे. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'राहा' असे ठेवले आहे. नीतू कपूर यांनी हे नाव दिले होते. आलियाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या नावाचा अर्थही सांगितला आहे. राहा या शब्दाचा अर्थ जॉय म्हणजेच आनंद असा आहे. याशिवाय संस्कृतमध्ये राहा हे एक गोत्रही आहे.

आलियाने म्हटले आहे की, राहा या शब्दाचा बंगाली भाषेतील अर्थ आराम किंवा दिलासा असा आहे. अरबी भाषेत या शब्दाचा अर्थ शांतता असा आहे. याशिवाय आनंद, स्वातंत्र्य आणि खुशी असेही या शब्दाचे इतर अर्थ आहे. जेव्हा बाळाचा हात पहिल्यांदा हातात घेतला तेव्हा आम्हा दोघांनाही हे सर्व अर्थ जाणवले. आमच्या कुटुंबाला नवे जीवन देण्यासाठी तुझे आभार. असे वाटत आहे की, आमच्या जीवनाला आत्ता खरी सुरवात झाली आहे.

आलियाने 6 नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला होता. सोशल मीडियात पोस्ट करून आलियाने ही माहिती दिली होती. आमच्या आयुष्यातील बेस्ट न्यूज आली आहे. आमचे बाळ जगात आले आहे. ती एक जबरदस्त मुलगी आहे. हा आनंद व्यक्त करणे अवघड आहे. आम्ही पालक बनलो आहोत, असे आलियाने त्या पोस्टमध्ये म्हटले होते.

27 जून रोजी आलियाने ती गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर आणि आलियाने लग्न केले होते. दोघेही पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Mapusa: भंगार वेचण्याच्या बहाण्याने आल्या, 'स्क्रू-ड्रायव्हर' घेऊन घुसल्या घरात; म्हापशात चोरीचा डाव उधळला; एका महिलेला अटक

SCROLL FOR NEXT