Sanya Malhotra Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

धाक्कड गर्लचा बोल्ड 'ओ अंतावा' डान्स तुम्ही पाहिला का?

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने समंथा रुथ प्रभूच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पराज: द राइज या चित्रपटातील ओ अंतवा या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला (Sanya Malhotra Viral Video) आहे ज्यात ती समंथा रुथ प्रभूच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पराज: द राइज (Pushparaj: The Rise) या चित्रपटातील ओ अंतवा या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसून येत आहे. एक कोरिओग्राफरही तिच्यासोबत डान्स करत आहे. सान्या मल्होत्रा ​​ओ अंतवा गोण्यावरती बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे, तर तिने हे गाणे एका नव्या पद्धतीने कोरिओग्राफ केले आहे.

सान्याने बोल्ड व्हिडिओ शेअर करताना अनेक इमोजी कमेंट केल्या आहेत, यासोबत तिने अनेकांना टॅगही केले आहे. सान्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला आहे. त्याला 3 तासांत 171000 हून अधिक लाईक्स मिळाले असुन आतापर्यंत 500 कमेंट्सही आल्या आहेत.

सान्याच्या व्हिडिओवर लोकांनी हार्ट आणि फायर इमोजी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'सुपरल' एका चाहत्याने लिहिले की, 'मी तुला पुन्हा लग्नासाठी विचारत आहे.' दुसऱ्याने लिहिले की, 'ग्रेट.' तिसऱ्याने लिहिले, 'डान्सपेक्षा व्हिडिओग्राफी चांगली आहे.

दंगल चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​दिसली होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले गेले जातात. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते, ज्यांना चाहत्यांकडून खूप पसंती दिली जाते. सान्या मल्होत्रा कोरिओग्राफर देखील आहे. तिने आमिर खानसाठी अनेक गाण्यांची कोरिओग्राफी देखील केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT