Riteish Deshmukh Dainik Gomantak
मनोरंजन

Riteish Deshmukh: कॉमेडीच नव्हे तर गंभीर भूमिकेतूनही रितेशने पाडली अभिनयाची छाप

रितेशने 2003 मध्ये बॉलीवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

बॉलिडमधील सुप्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कॉमिक टायमिंग आणि उत्कृष्ट कामगिरीने, 'एक विलन' स्टारने सातत्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. रितेश (Riteish Deshmukh) हा सर्वात आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. त्याने 2003 मध्ये बॉलीवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2013 मध्ये अभिनेता म्हणून यश मिळवल्यानंतर त्याने निर्माता म्हणून पदार्पण केले. आज त्याच्या वाढदिवसानिमीत्त रितेशचे बेस्ट परफॉर्मन्स चित्रपट (Movie) कोणते हे पाहणार आहोत.

'हाऊसफुल्ल'

रितेश हाऊसफुल या लोकप्रिय चित्रपटाच्या चारही भागांमध्ये दिसला आहे. 2010 मध्ये रिलीज झालेल्या साजिद खान चित्रपटात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.या चित्रपटामध्ये त्याने चाहत्यांना पोटभरुन हसवले आहे.

housefull

एक विलेन

या चित्रपटामधील रितेशची कामगिरी सर्वांच्या पसंतीस पडली. त्याच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांने राकेश महाडकर ही व्यक्तिरेखा साकारली, जो आपल्या पत्नीकडून सतत अपमान सहन करतो. परिणामी तो रागावतो आणि निराश होतो आणि त्याचा अनादर करणार्‍या इतर स्त्रियांना मारून टाकतो. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

ek villain

'तेरे नाल लव हो गया'

तेरे नाल लव हो गया या चित्रपटात जेनेलिया डिसूझा आणि रितेश यांनी एकत्र काम केले आहे. मनदीप कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली 2012 मध्ये रिलीज झाला होता.या जोडीने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनं जिंकली.

tere naal love ho gaya

'मस्ती'

मस्ती ही भारतीय सेक्स कॉमेडी चित्रपट आहे. अशोक ठकेरिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. आफताब शिवदासानी, रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भुमिका साकारली आहे.

masti

हे बेबी

2007 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे हे बेबी चित्रपट आहे. यामुळे प्रेक्षकांना रितेशची कोमल आणि प्रेमळ बाजू पाहण्याची संधी मिळाली. तो चित्रपटात "एडी टेडी" म्हणून काम करतो, जो मुलांचे मनोरंजन करतो. साजिद खान दिग्दर्शित या चित्रपटात रितेशसोबत अक्षय कुमार, फरदीन खान आणि विद्या बालन यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

'Heyy Babyy'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT