Avinash Sachdev Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss OTT: फलकची बहिण शफाक नाझबरोबरच्या नात्याबद्दल अविनाश म्हणाला, आम्ही एकत्र...

Bigg Boss OTT: आम्ही शूटिंगसाठी महाबळेश्वरमध्ये 20 दिवस राहिलो

दैनिक गोमन्तक

Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यातील कंटेस्टंटमुळे हा शो मोठ्या प्रमाणात गाजत असतो. शोमध्ये कधी भांडण, तोडफोड तर कधी मैत्री आणि प्रेम दिसून येते. ही नाती कधीकधी इतकी मजबूत होतात की ती शो संपल्यानंतरही दिसतात. या सीझनमध्ये अविनाश सचदेव आणि फलक नाझ यांच्यात चांगला बॉंड दिसून आला होता.

आता मात्र ती अविनाश आणि फलकची बहिण शफाक नाझ यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. जेव्हा अविनाश 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये होता, तेव्हा त्याचे फलक नाजसोबतचे बॉन्डिंग दिसले होते आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसले होते.

मात्र, त्याचवेळी फलाकची बहीण शफाक नाजसोबतच्या त्याच्या पूर्वीच्या नात्याबद्दल बऱ्याच बातम्या आल्या होत्या. पण आता अविनाशने एका मुलाखतीत या अफवांचे खंडन केले आहे.

अविनाश म्हणाला, 'असं काही नव्हतं, आम्ही एकत्र एक उत्तम शो केला आणि तो एक उत्तम आऊटडोअर शूट होता. आम्ही शूटिंगसाठी महाबळेश्वरमध्ये 20 दिवस राहिलो आणि हा एक उत्तम अनुभव होता, उत्तम शूट, शो आणि उत्तम बाँडिंग होते. यापलीकडे काहीही झालेले नाही. या सगळ्या अफवा होत्या.

याबरोबरच, अविनाशने आपण नुकतेच फलकला भेटल्याचा खुलासा केला आहे. जेद हदीद दुबईला जाणार आहे. त्याआधी आम्ही दोघेही फलक आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला भेटलो. फलक आणि मी एकाच पेजवर असल्याने मी आनंदी असल्याचेदेखील अविनाशने म्हटले आहे.

दरम्यान, 14 ऑगस्टला ग्रँड फिनाले होणार असून यावेळी बीग बॉसचा किताब कोण आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT